लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. प्रचारासाठी केंद्रीय नेते वेगवेगळ्या मतदार संघात येत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेतेही दाखल होत असल्याचे दिसून येत आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी स्मिता वाघ जळगाव विमानतळावर आल्या होत्या. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विमानतळावर दाखल झाले. समोर शरद पवार येताना दिसताच स्मिता वाघ यांनी त्यांना वाकून नमस्कार घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी आमदार सुरेश भोळेही उपस्थित होते. तेही शरद पवारांच्या पाया पडले.
हेही वाचा - 'जय भवानी' वरून निवडणूक आयोग अडले, ठाकरे थेट नडले, वाद पेटणार?
शरद पवारांनी काय आशिर्वाद दिले?
जळगाव विमानतळावर भाजप उमेदवार स्मिता वाघ उपस्थित होत्या. त्याचवेळी शरद पवार यांचे आगमन झाले. समोर शरद पवार आहेत हे पाहिल्यानंतर स्मिता वाघ यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या पाया त्या पडल्या. त्यानंतर पवारांनी आपल्याला आशिर्वाद दिल्याचे वाघ म्हणाल्या. पवार हे जेष्ठ नेते आहेत. आपली परंपरा आहे. त्यानुसार मी त्यांच्या पाया पडले. त्यांनीही मला आशिर्वाद दिला. असेही त्या म्हणाल्या. मात्र तो आशिर्वाद काय होता हे मात्र वाघ यांनी सांगितले नाही. त्यांनी मनातून आशिर्वाद दिला आणि मी तो मनातून स्विकारला असेही त्या म्हणाल्या.
जळगावमध्ये लढत कोणात?
भाजपने या मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे पाटील यांना मानणारा गट नाराज झाला. त्यामुळे उन्मेश पाटील नाराज झाले. त्यांनी आपल्या नाराजीला वाट करत थेट शिवसेना ठाकरे गटाचा रस्ता धरला. ठाकरेंनीही मग या मतदार संघातून त्यांचे समर्थक करण पवार यांनी मैदानात उतरवलं आहे. करण पवार हे उन्मेश पाटील यांते समर्थक आहेत. त्यांनीही भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांची लढत भाजपच्या स्मिता वाघ यांच्या बरोबर आहे. पवार यांचा पारोळा, एरंडोल या मतदार संघात चांगला जनसंपर्क आहे. शिवाय ते पारोळ्याचे नगराध्यक्षही राहीले आहेत. त्यामुळे ही लढत रंजक होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world