धाराशिव लोकसभेचे वातावरण आरोप प्रत्यारोपांनी तापलं आहे. ओमराजेंवर एकीकडून राणाजगजितसिंह पाटील हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत घेरत आहेत. अशामध्ये ओमराजेंची गाडीही सुसाट सुटली आहे. त्यांनी आता असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी मतदारांना अर्चना पाटील या पैसे कसे वाटत आहेत हे सांगताना त्यांच्याकडून तु्म्हीही पैसे घ्या. उलट भांडून घ्या असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे ओमराजेंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ओमराजेंच्या बोलण्यात अर्थ काय?
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यानी मोठं वक्तव्य केलं आहे. समोरच्या उमेदवाराकडून म्हणजेच अर्चना पाटील यांनी पैस दिले तर घ्या, भांडून घ्या. एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा. आणखी त्या गल्लीत थांबलेत म्हणून सांगा. अजुन दुप्पट द्यावे लागत आहेत म्हणून सांगा. मला तर कळालं आहे 50 ते 60 कोटी रुपये वाटण्याचा त्यांचा प्लॅन आहे. असा थेट आरोपच ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. तुमची मजाच मजा आहे. चंगळच चंगळ आहे. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?
धाराशिवमध्ये थेट लढत
धाराशिव लोकसभेत शिवसेना ठाकरे गट विरूद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होत आहे. ओमराजे यांना आपला गड राखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. तर अर्चना पाटील यांना पहिल्यांदा लोकसभेत जायचं आहे. अर्चना पाटील ह्या ऐन वेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आल्या. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. जरी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्या तरी त्यांच्यासाठी भाजपची सर्व यंत्रणा राबत आहे. शिंदे गटाचा एक गट जरी या सर्वावर नाराज असला तरी तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार चालवला आहे. ही जागा शिंदे गटाला मिळावी असा सुरूवातीला आग्रह होता.