एकनाथ खडसेंचं राजकारणातून सन्यास घेण्याबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

खडसे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता खडसे यांनीच पुर्ण विराम दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश अजूनही लांबलेला आहे. अशात खडसेंनी आपल्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीबद्दल मोठं विधान केले आहे. खडसे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता खडसे यांनीच पुर्ण विराम दिला आहे. मी मरेपर्यंत राजकीय संन्यास घेणार नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र असं असलं तरी विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा न लढण्याचा निर्णय 

एकनाथ खडले यांनी आपण राजकारणातून निवृत्त होणार नाही हे स्पष्ट केले आहे. शिवाय भविष्यात विधानसभा निवडणूक ही लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आपण विधानपरिषदेचे सदस्या आहे. त्यामुळे अशा वेळी विधानसभा लढण्याचा प्रश्नच येत नाही असेही ते म्हणाले. त्याच बरोबर घरात एक खासदार आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढण्याचाही कोणता विचार नाही असेही खडसे यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे राजकारणातून निवृत्त होत नसलो तरी त्यांनी निवडणूक मात्र लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.  

हेही वाचा - रावेर लोकसभा : एकनाथ खडसेंच्या घरवापसीचा सुनेला फायदा?

'पक्ष प्रवेशाला कोणाचा विरोध नाही' 

बऱ्याच दिवसापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र तो अजूनही होऊ शकलेला नाही. याबाबतही खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आपला भाजपमध्ये पक्ष प्रवेश होईल असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय आपल्या पक्षप्रवेशाला कोणाचाही विरोध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खडसेंच्या पक्षप्रवेशाला फडणवीस, गिरीश महाजन यांचा विरोध आहे अशी चर्चा होती.  

रोहिणी खडसेंना ऑफर पण... 

रोहिणी खडसे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे असे त्यांना आपण आवाहन केले होत असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र त्यांनी आपण शरद पवारांबरोबरच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्या विवाहीत आहेत. शिवाय त्या वेगळ्याही राहातात. त्यामुळे त्यांना विचाराचे स्वातंत्र्य आहे असेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

Advertisement