Maharashtra Election Results 2024 Timings : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी झाली. विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष निवडणूक निकालांकडं लागलंय.
राज्यात यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होती. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन प्रमुख पक्ष होते. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांचं आव्हान होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक्झिट पोल काय सांगतात ?
विधानसभा निवडणुकीनंतर वेगवेगळ्या संस्था तसंच वृत्तवाहिनींनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुतीला बहुमत मिळेल ही शक्यता व्यक्त करणाऱ्या एक्झिट पोलची संख्या जास्त आहे. काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत दाखवण्यात आले आहेत. तर काही पोलनुसार राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असा अंदाज आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे )
महत्त्वाचे मतदारसंघ कोणते?
विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघातील निकाल हे महत्त्वाचे आहेत. त्या मतदारसंघातील नागरिकांचं आपला मतदार कोण होणार ? याकडं लक्ष लागलंय. पण, काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे त्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम), उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (साकोली) यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे (वरळी), मनसेचे अमित ठाकरे (माहीम) या दोन ठाकरे बंधूचं भवितव्य देखील शनिवारी स्पष्ट होईल.
( नक्की वाचा : Maharashtra Exit Polls 2024 : महाराष्ट्रात कुणाचं सरकार? पाहा काय सांगतात एक्झिट पोल )
किती वाजता सुरु होईल मतमोजणी ?
निवडणूक आयोग सर्व 288 मतदारसंघाची मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुुरु करेल. सुरुवातीच्या काही तासांमध्ये कल स्पष्ट होतील. संध्याकाळपासून निकाल लागण्यास सुरुवात होईल. शनिवारी रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होईल.
कुठे पाहणार निवडणूक निकाल? (Where and how to watch Maharashtra Election results)
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (www.eci.gov.in or results.eci.gov.in) तुम्हाला सर्व निकाल पाहता येतील.
त्याचबरोबर NDTV मराठी च्या वेबसाईटवर तसंच यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्व निकालाचे अचूक अपडेट आणि विश्लेषण पाहाता येईल. त्याचबरोबर 'NDTV मराठी' वृत्तवाहिनीवरही तुम्हाला दिवसभर निवडणूक निकालांचं अपडेट आणि विश्लेषण पाहता येईल.