Election results 2026 Live Update : पश्चिम बंगाल आणि आसामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान झाले होते. इथं ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला शह देण्याच्या तयारीत भाजप आहे. तर आसाममध्ये चुरशीची लढत होत आहे. याची मतमोजणी आज सोमवारी होत आहे. त्याची प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही देणार आहोत.
West Bengal election Result LIVE: बंगालच्या मतदारांची भाजपाला रेकॉर्डब्रेक साथ, तृणमूल काँग्रेसवरील 'ममता' घटली
West Bengal election Result LIVE: बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपानं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. भाजपानं आत्तापर्यंत 11 जागा जिंकल्या असून 189 मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसला दोन अंकी जागांवर समाधान मानावं लागत आहे.
ताज्या वृत्तानुसार तृणमूल काँग्रेस पक्ष 85 जागांवर आघाडीवर आहे.
Assam election Result LIVE: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगई यांचा पराभव
Assam election Result LIVE: आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ते त्यांच्या जोहरट या मतदार संघातून पराभूत झाले आहे. त्यांना भाजप उमेदवाराने जवळपास 23 हजार मतांनी पराभूत केले.
West Bengal election Result LIVE: ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रीया
West Bengal election Result LIVE: मतमोजणी धीम्या गतीने सुरू असल्याचा ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे. निवडणूक आयोग मनमानी करत आहे असा आरोप ही त्यांनी केला. निवडणूक निकाल बदलण्याचा डाव आखला जात असल्याची प्रतिक्रीया ही त्यांनी दिली आहे.
Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या घरा बाहेर जोरदार राडा
Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या घरा बाहेर जोरदार राडा झाला आहे. आसनसोलमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तोडफोड केल्याचे समोर आले आहे. बंगालमध्ये सुरूवातीच्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजपची 98 जागांवर मुसंडी
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजपची 98 जागांवर मुसंडी आहे. आसाममध्ये भाजपने एकतर्फा विजय मिळवल्याची स्थिती आहे. काँग्रेसला केवळ 26 जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. कला नुसार आसाममध्ये ही भाजपचे सरकार बनत असताना दिसत आहे.
Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का, 178 जागांवर भाजप आघाडीवर
Election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. कला नुसार 178 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर 113 जागांवर टीएमसी आघाडीवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
West Bengal election Result LIVE: सुरूवातीच्या कलात पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत
West Bengal election Result LIVE: सुरूवातीच्या कलात पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता
आतापर्यंत 294 जागांचे कल हाती आले
भाजपचे 146 उमेदवार आघाडीवर
टीएमसीचे 102 उमेदवार आघाडीवर
काँग्रेस 5 जागी आघाडीवर
Assam election Result LIVE: सुरूवातीच्या कलानुसार भाजपला आसाममध्ये बहुमत
Assam election Result LIVE: सुरूवातीच्या कलानुसार भाजपला आसाममध्ये बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 19 जागांवर आघाडी घेतली आहे.
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपची 100 जागांवर आघाडी
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपची 100 जागांवर आघाडी, ममता बॅनर्जींचा टीएमसी 84 ठिकाणी आघाडीवर, भाजपच्या जागांचे बंगालमध्ये शतक
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये TMC- भाजप सम-समान 73-73 जागांवर आघाडीवर
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये TMC- भाजप सम-समान 73-73 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपची आघाडी टीएमसीने मोडताना दिसत आहे. बंगालमध्ये पहिल्या एक तासाच्या कलावरून दोन्ही पक्षात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचे कल हाती, भाजपची आघाडी, TMC पिछाडीवर
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचे कल हाती आले आहेत. त्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपला 61 जागांवर आघाडी आहे. तर TMC ला 40 जागांवर आघाडी मिळाली आहे. दोन्ही पक्षात 20 जागांचा फरक आहे.
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी
आसाम
एकूण जागा- 126
भाजप- 34
काँग्रेस- 8
एआययुडीएफ- 2
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये भाजप टीएमसीमध्ये 10 जागांचे अंतर
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये भाजप टीएमसीमध्ये 10 जागांचे अंतर
पश्चिम बंगाल
एकूण जागा- 294
भाजप-36
टीएमसी- 25
डावे- 0
काँग्रेस- २
इतर -
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. इथं भाजपने एकतर्फी मोठी आघाडी घेतली आहे.
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर, काँग्रेससाठी ही दिलासा देणारी बाब आहे. दुसरीकडे भाजप 15 तर टीएमसी 12 जागांवर आघाडीवर आहेत.
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 17 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 17 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये पहिल्या फेरीत कट टू कट फाईट
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये टीएमसी सहा जागांवर तर भाजप सात जागांवर आघाडीवर आहे. बंगालमध्ये सध्या कट टू कट फाईट पाहायला मिळत आहे.
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर
Assam election Result LIVE: आसाममध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांना अजून ही खाते खोलता आलेले नाही. या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे.
West Bengal election Result LIVE: भवनीपूर मतदार संघातून ममता बॅनर्जी आघाडीवर
West Bengal election Result LIVE: भवनीपूर मतदार संघातून ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपचे सुवेंदू अधिकारी हे पिछाडीवर आहेत.
Assam election Result LIVE: आसाममध्ये 7 जागांवर भाजप आघाडीवर
Assam election Result LIVE: आसाममध्ये 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
Assam election Result LIVE: आसाममध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने
Assam election Result LIVE: आसाममध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने लागला आहे. इथं सध्या भाजपचे सरकार आहे.
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये 3 जागांवर TMC आघाडीवर
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये 3 जागांवर TMC आघाडीवर तर दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे. सुरूवातीपासून भाजप टीएमसीमध्ये काटे की टक्के पाहायला मिळत आहे.
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये पहिला कल TMC च्या बाजूने
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये पहिला कल TMC च्या बाजूने आला आहे.
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगाल, आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात, पहिला कल थोड्या वेळात
Election results 2026 Live Update : पश्चिम बंगाल, आसाममध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे., पहिला कल थोड्या वेळात मिळेल. पहिले पोस्टल मतं मोजली जात आहेत.
West Bengal election Result LIVE: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचा मोठा आरोप
West Bengal election Result LIVE: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचा मोठा आरोप
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोप केला आहे की, बंगालमधील चार स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही कॅमेरे रात्री २३:५२ वाजल्यापासून २ मिनिटे आणि १६ सेकंदांसाठी बंद करण्यात आले होते.
- ज्या चार स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते, त्यांमध्ये कृष्णनगर नॉर्थ ८३, छपरा ८२, कालिगंज ८० आणि नकाशीपारा ८१ यांचा समावेश आहे."
West Bengal election Result LIVE: मतमोजणी आधी बंगालमध्ये मोठा ट्वीस्ट
West Bengal election Result LIVE: मतमोजणी आधी बंगालमध्ये मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा केला आहे. शिवाय एकमेकांवर हेराफेरीचे आरोप केला आहेत. त्यामुळे प्रत्येक मतमोजणी केंद्रा बाहेर तणावाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
West Bengal election Result LIVE: भवनानीपूर विधानसभा निकालाकडे सर्वांचे लक्ष
West Bengal election Result LIVE: भवनानीपूर विधानसभा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वात हाय व्होल्टेज लढत या मतदार संघात होत आहे. इथं ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात लढत होत आहे.
Assam election Result LIVE: जारोठमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार
West Bengal election Result LIVE: तीन स्तरीय सुरक्षेसह निवडणूक आयोग मतमोजणीसाठी सज्ज
West Bengal election Result LIVE: सुवेंदू अधिकारी यांनी घेतले देवाचे दर्शन
West Bengal election Result LIVE: भाजप उमेदवार म्हणतात बंगालमध्ये सुनामी येणार
Election Result LIVE: बंगाल आसाममध्ये झालं होतं बंपर मतदान
Assam election Result LIVE: आसाममध्ये मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण , थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात
West Bengal election Result LIVE: कोलकात्यात मतमोजणी केंद्रा बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात
West Bengal election Result LIVE: बंगालमध्ये भाजपचे सरकार येण्याचा कार्यकर्त्यांना विश्वास
West Bengal election Result LIVE: टीएमसी कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप
West Bengal election Result LIVE: मतमोजणी आधीच कोलकात्यात टीएमसी भाजपमध्ये राडा
West Bengal election Result LIVE: सट्टा बाजाराजाचा कल भाजपच्या बाजूने
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगाल निवडणूक निकालाचा सट्टा बाजाराजाचा कल भाजपच्या बाजूने असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आजच्या निकाला बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगालमध्ये चुरशीची लढत
West Bengal election Result LIVE: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. इथल्या एक्झिट पोलमध्ये ही त्याची झलक पाहायला मिळाली आहे. ममता बॅनर्जी समोर भाजपने मोठे आव्हान निर्माण केले आहे. काही एक्झिट पोल हे ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असे सांगत आहे. तर काहींनी भाजपच्या बाजूने कल दिला होता.
Election Result LIVE: आसामच्या 126 जागांसाठी मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात होईल
Election Result LIVE: आसामच्या 126 जागांसाठी मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात होईल. इथं भाजपचं सरकार आहे. इथं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या समोर काँग्रेसच्या गौरव गोगई यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे.
Election Result LIVE: बंगाल विधानसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष
Election Result LIVE: बंगाल विधानसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. इथं ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपने हे राज्य ममता यांच्या हातून हिसकावून घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे बंगालमध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Election Result Today: थोड्याच वेळात मत मोजणीला सुरूवात होणार
Election Result Today:विधानसभा निवडणूक 2026 (Election Result Today)
बंगाल विधानसभा - 294 जागा - पहला टप्पा 93%, दूसरा टप्पा 90% मतदान
आसम विधानसभा - 126 सीटें - 86% मतदान