जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सामील असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) वर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी शनिवारी धक्कादायक विधान केलं आहे. ईव्हीएम मशीन हॅक केलं जाऊ शकतं, त्यामुळे याचा वापर थांबावयाल हवा. यानिमित्ताने त्यांनी अमेरिकेतील निवडणुकीतील ईव्हीएम हटविण्याची मागणी केली आहे.
एलन मस्क यांनी केलेलं वक्तव्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. कॅनेडी ज्युनियर यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना केलं आहे.
काय आहे कॅनेडींची पोस्ट?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार कॅनेडी ज्युनिअर यांनी असोसिएटेड प्रेसचा हवाला देत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणाले की, पोर्तो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये शेकडो विसंगती आढळून आल्या आहेत. मतांमध्ये विसंगती असल्यामुळे पेपर ट्रेलचा आधार घेत मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र येथे पेपर ट्रेलचा आधार घेण्यात आला, मात्र जेथे पेपर ट्रेल नाही त्या भागात काय परिस्थिती असेल? ते पुढे म्हणाले की, प्रत्येक मतांची मोजणी करण्यात आली आहे, हे अमेरिकेतील नागरिकांना माहीत असणं आवश्यक आहे. निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप रोखण्यासाठी त्यांनी पेपर बॅलेजवर जावं लागेल.
नक्की वाचा - जॉर्जिया मेलोनींनी PM मोदींसोबत शेअर केला व्हिडिओ, मोदींकडूनही आलं उत्तर
एलन मस्क काय म्हणाले?
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. याचा वापर निवडणुकीत मत रेकॉर्ड करणे आणि मतमोजणीसाठी केला जातो. या मशिनचा मुख्य उद्देश मतदान आणि मोजणी प्रक्रिया सहज, गतीने आणि विश्वासार्हता राखणं हा आहे. भारतात ईव्हीएमचा वापर लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणूक अशा विविध प्रकारच्या निवडणुकीत केला जातो.
पोर्तो रिकोच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?
पोर्तो रिको येथे झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये विसंगती आढळली आहे. पोर्तो रिको हा एक स्वायत्त कॅरेबियन प्रांत आहे. ज्याचे प्रशासकीय अधिकार हे अमेरीकेकडे आहेत. नोव्हेंबरमध्ये पोर्तो रिको येथे राज्यपाल निवडीसाठी निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी पोर्तो रिकोत राज्यपाल उमेदवार निवडीसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये शेकडो विसंगती आढळून आल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये चुकीची मतमोजणी होत असल्याचं उघड झालं. काही उमेदवारांना थेट शून्य मतं मिळाली तर काहींची मतं रिव्हर्स झाली. काही ठिकाणी बॅलेट पेपरपेक्षा ईव्हीएमची मतं कमी होती. ईव्हीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एलन मस्क यांनी ईव्हीएम मशिन हटवण्याची मागणी केली आहे.