धुळ्यात होणार तिरंगी लढत, माजी भाजपा आमदारची रिंगणात एन्ट्री

Dhule Lok Sabha Election 2024 : भाजपा आणि काँग्रेसच्या नाराज गटाला सोबत घेऊन माजी आमदार अनिल गोटे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. (प्रातिनिधिक फोटो)
धुळे:

धुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांपुढं नवं आव्हान उभं राहिलंय. भाजपानं इथून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील एका गटात नाराजीचं वातावरण आहे. या दोन्ही गटातील नाराजांना एकत्र करुन नवीन आघाडीसाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. 

भाजपा आणि काँग्रेसच्या नाराज गटाला सोबत घेऊन माजी आमदार अनिल गोटे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. सुभाष भामरे यांना भाजपानं उमेदवारी दिल्यानं पक्षात नाराजीचा सूर उमटलाय. तर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीच्या विरोधात धुळ्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेण्याची तयारी गोटे यांनी सुरु केली आहे.


कोण आहेत गोटे?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ अनिल गोटे सक्रीय आहेत. 1999 साली ते सर्वप्रथम धुळ्यातून आमदार झाले होते.  अब्दुल करिम तेलगी घोटाळ्यात त्यांना चार वर्ष जेलमध्ये राहावं लागलं होतं. 2007 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. गोटे यांच्यावरील याबाबतचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

धुळ्यात काँग्रेसची 'शोभा', 'परत जा' च्या घोषणांसह कार्यकर्त्यांचा राडा
 

2007 साली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2009 आणि 2014 साली ते भाजपाच्या तिकिटावर धुळे शहरातून निवडून आले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाला रामराम केला. त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी होता आलं नाही. AIMIM पक्षाच्या शाह फारुक अन्वर यांनी त्यांचा पराभव केला. धुळे शहरात सर्वच पक्षात गोटे यांचा मित्रपरिवार आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यास ही लढत तिरंगी होईल. गोटे कोणत्या पक्षाची मतं खेचतात त्यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असेल. 
 

Topics mentioned in this article