Exclusive : 'आमचं पारडं जड', 2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत

NDTV ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाबाबत मोठा दावा केला आहे. देशातील जनतेला आमच्या सरकारवर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDTV ला खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी देशातील जनतेला आमच्या सरकारवर पुर्ण पणे विश्वास आहे. शिवाय भाजप या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक विजय नोंदवणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. देशातल्या जनतेला माहित आहे की त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी हे सरकार सक्षम आहे, असेही ते म्हणाले. NDTVचे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांना दिलेल्या एक्सक्लूसिव इंटरव्यू मध्ये पीएम मोदींनी लोकल पासून अगदी ग्लोबल पर्यंत सर्व मुद्द्यांवर सविस्तर उत्तर दिली. ही मुलाखत आज रविवारी रात्री 8 वाजता प्रदर्शित होईल. 

Advertisement

पंतप्रधान मोदींची ही आता पर्यंतची सर्वात वेगळी आणि व्यापक मुलाखत आहे. या मुलाखतीतून त्यांनी भविष्यातला भारत कसा असेल हे सांगितले आहे. देशाती अर्थव्यवस्था, राजकारण, कुटनिती, लोकल पासून ग्लोबलपर्यंत विचारलेल्या बेधकड प्रश्नाना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिली आहेत. 

Advertisement
Advertisement

लोकसभा निवडणुकीत भाजप विजयाचे मोठे रेकॉर्ड बनवणार आहे. देशातल्या जनतेला सरकारवर विश्वास आहे. जनतेला एका गोष्टीची जाणीव आहे की एक असे सरकार आहे ज्याला आमच्या दुख: आणि अडचणींची काळजी आहे. शिवाय जनतेची स्वप्न काय आहेत याचाही अंदाज या सरकारला आहे अशी भावना जनतेची आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप मोठा विजय नोंदवणार आहे. 

NDTV चे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांच्या बरोबरची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही संपुर्ण एक्सक्लूसिव मुलाखत रविवार रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. ही मुलाखत NDTV नेटवर्क वर पाहाता येणार आहे. शिवाय डिजिटल प्लेटफॉर्म marathi.ndtv.com, ndtv.in वर सविस्तर विश्लेषण वाचता येईल.  आणि  यू-ट्यूब वर https://www.youtube.com/@NDTVMarathi आणि https://www.youtube.com/@ndtvindia यावर लाईव्ह पाहाता येईल.