भाजप खासदाराला सवाल करणारा शेतकरी गायब, 'त्याच्या' बरोबर काय झालं?

जाहिरात
Read Time: 2 mins
माढा:

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्ष मेळावे, सभा घेत आहेत. माढा लोकसभेतही भाजपकडून असे मेळावे सभा घेणे सुरू आहे. मात्र माढा लोकसभेतल्या टेंभूर्णी इथे झालेला भाजपचा कार्यकर्ता मेळावा वेगळ्या कारणासाठी गाजला. या मेळाव्यात एका शेतकऱ्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शेती धोरणाबाबत जाब विचारला. त्यामुळे या मेळाव्यात एकच गोंधळ उडाला. शेवटी जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आले. तो शेतकरी आता नॉट रिचेबल झाला आहे. त्याचे नक्की काय झालं? तो कुठे गेला याची चर्चा आता होऊ लागली आहे. 

भाजप मेळाव्यात काय झालं? 
टेंभूर्णी येथे भाजपचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. त्यावेळी एक शेतकरी उभा राहून शेती धोरणाबाबत थेट प्रश्न विचारू लागला. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं? शेतमालाला किती भाव दिला? कंपनीकडून फसवणूक होत आहे. यासारख्या प्रश्नांची सरबत्ती त्यांने केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी त्यांना मध्येच थांबत तुम्ही कोणत्या पक्षाकडून आलात असा प्रश्न केला. त्यावर तो शेतकरी भडकून मी कोणत्या पक्षाचा नाही तर एक शेतकरी आहे माझा प्रश्नाचे उत्तर द्या असे म्हणाला. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलीस आणि कार्यकर्त्यांनी मिळून त्या शेतकऱ्याला मेळाव्याच्या बाहेर काढले. 

Advertisement

हेही वाचा - भाजप खासदार सासऱ्यावर सुनेचे गंभीर आरोप, निवडणुकीच्या तोंडावर अडचण वाढणार?

'तो' शेतकरी झाला गायब 
भाजपच्या मेळावा हलवून सोडणाऱ्या या शेतकऱ्याची नंतर शोधाशोध झाली. त्यांची नक्की भूमिका काय होती? त्यांना काय प्रश्न मांडायचे होते? त्यांच्या बरोबर त्या मेळाव्यात काय झाले? हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तो शेतकरी नॉट रिचेबल होता. त्यामुळे तो शेतकरी नक्की कुठे गायब झाला याची चर्चा आता संपुर्ण मतदार संघात होत आहे.  

Advertisement


     
माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर रिंगणात 
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत आहे. त्यातच धैर्यशील मोहीते पाटील यांनी त्यांच्या विरोधात लढण्याचे ठरवले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळेल याची अपेक्षा आहे. तसं झाल्यास माढ्यात नाईक निंबाळकर विरुद्ध मोहीते पाटील असा सामना रंगेल. दरम्यान धैर्यशील मोहीते पाटील अजूनही वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.     

Advertisement