नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी शपथ घेणार आहे. 9 जून रविवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होणार आहे. या महाराष्ट्रातल्या चार जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. ही चार नावं जवळपास निश्चित झाली आहे. त्यात भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल यांचा समावेश आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे मंत्रीपदाची शपथ घेतली. या यादीत आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएने बाजी मारली. तर इंडिया आघाडी बहुमतापासून थोडक्यात दुर राहीली. अशा वेळी एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार रविवारी हा शपथ सोहळा होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल.
हेही वाचा - मोठा गौप्यस्फोट! प्रतिभा धानोरकरांचा 'लाख' मोलाचा विजय, पडद्यामागून कोणाची मदत?
महाराष्ट्रातून या मंत्रीमंडळात कोणकोण असेल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शिवाय कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याबाबतही तर्क लढवले जात आहेत. त्यात आता महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे मंत्री म्हणून शपथ घेणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेत तेच सध्या जेष्ठ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही एक मंत्रीपद मिळणार आहे. ते कोणाला द्यायचे याबाबत सुरूवातीला दोन नावे होती. एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे आणि सुनिल तटकरे. पण राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकच मंत्रीपद आल्याने त्या जागेवर पटेल यांची वर्णी लागणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा - उपोषणाला परवानगी नाही, तरीही जरांगे उपोषणावर ठाम, प्रशासनाची डोकेदुखी वाढणार?
पहिल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीत रिपाईच्या रामदास आठवलेंचा शपथविधी होणार नसल्याची माहित समोर येत आहे. शिवाय भाजपच्या राज्यातल्या काही विद्यमान मंत्र्यांचाही हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यांनाही संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. विद्यमान मंत्री नारायण राणेहे ही दिल्लीत तळ ठोकून आहेत. पण त्यांच्या शपथविधी बाबतही अनिश्चितता आहे.