उदयनराजें समोरच आजोबांनी कॉलर उडवली, राजेंनी काय केलं?

Advertisement
Read Time2 min
उदयनराजें समोरच आजोबांनी कॉलर उडवली, राजेंनी काय केलं?
सातारा:

सुजित आंबेकर 

सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर उदयनराजे यांनी प्रचाराची राळ उठवली आहे. भेटीगाठी, मेळावे, जाहीर सभांचा सध्या सातारा लोकसभा मतदार संघात धडाका सुरू आहे. असाच एक मेळावा कोरेगावमध्ये सुरू होता. त्यावेळी एक आजोबा उदयनराजेंचे भाषण सुरू असताना मध्येच उभे राहीले. त्यानंतर त्यांनी राजेंच्याच स्टाईलमध्ये कॉलर उडवली. महाराज महाराज करत त्यांच्या नावाचा जयघोष केला. जेव्हा आजोबांनी कॉलर उडवली त्यावेळी उपस्थितांनी एक जल्लोष केला. शेवटी राजेंनी सर्वांना शांत राहाण्याचे आवाहन केले. 

आजोबांनी राजेंसमोर उडवली कॉलर 
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वर्णे, देगाव, निगडी, अंगापूर गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वर्णे येथे पार पडली. या मेळाव्यास आमदार महेश शिंदे, कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे उपस्थित होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याचवेळी उदयनराजे स्टाईलने कॉलर उडवत आजोबांची एन्ट्री झाली. त्यावेळी संपूर्ण मेळाव्यात शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. महाराजांनी हे दृष्य पाहील्यानंतर त्यांनाही हसू आवरले नाही. पण नंतर त्यांनी आता असं काही करू नका. शांत राहा असं आवाहन केलं. त्यानंतर आजोबांनीही राजेंचा आदेश मानत शांत राहात पुढील भाषण ऐकलं.

हेही वाचा -  'निधी देतोय तसं मशीनमध्ये कचा-कचा बटण दाबा', अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

साताऱ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप 
सातारा लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थेट लढत होत आहे. हा मतदार संघ सुटावा म्हणून अजित पवार आग्रही होते. मात्र त्यांना हा मतदार संघ सुटला नाही. भाजपने हा मतदार संघ राजेंसाठी स्वताच्या पदरात पाडून घेतला. इथे भाजपकडून उदयनराजे भोसले मैदानात आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. त्यामुळे इथे राजे बाजे मारणार की पवार पुन्हा राजेंचा गेम करणार याकडे सर्वांचे लक्षा लागले आहे.     

हेही वाचा - 'अब की बार 400 पार', होणार का? NDTV च्या पोल ऑफ पोल्सची आकडेवारी काय सांगते?


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: