Hatkanangale Lok Sabha 2024 : धैर्यशील माने की राजू शेट्टी, कोण बाजी मारणार?

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं हाच मुद्दा महायुतीकडून सर्वाधिक रेटला गेला. याशिवाय खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी केलेल्या 8000 कोटींहून अधिक विकासकामांची माहिती प्रचारातून देण्यात आली. 

Advertisement
Read Time: 3 mins

 कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यंदा महायुतीकडून धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी, तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून दादासाहेब पाटील हे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र बोलणी फिस्कटल्याने राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत येणे टाळले. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत झाली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीच्या अखेरच्या टप्प्यात जुळवा-जुळव

शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात नाराजीचा सूर असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अनेक नेते देखील त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. भाजप नेते प्रकाश आवडे यांना महायुतीकडून या मतदारसंघात पाठिंब्याची आशा होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन-तीन दिवस आधी ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर त्यांची नाराजी दूर झाली. शेवटच्या क्षणी धैर्यशील माने यांना प्रकाश आवाडे आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे त्यांना शाहूवाडी आणि इचलकरंजी मतदारसंघातून चांगली मते मिळण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा - Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?)

महायुतीच्या प्रचारातील मुद्दे

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं हाच मुद्दा महायुतीकडून सर्वाधिक रेटला गेला. याशिवाय खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी केलेल्या 8000 कोटींहून अधिक विकासकामांची माहिती प्रचारातून देण्यात आली. 

Advertisement

राजू शेट्टींचा शेतकरी मतदारांवर भर

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पाठीमागे अनेक शेतकरी होते. जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन, दूध दरवाढ आंदोलनांमुळे शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं. याशिवाय इचलकरंजीतील पाणी प्रश्न आणि वस्त्रोउद्योग यावरुन मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना घेरण्यात आलं होतं. त्या प्रश्नांचा आता काय झालं, यावर राजू शेट्टींना भर दिला.  

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना शाहुवाडी तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळेल. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट यांचाही पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघातील खासदारकीसाठी एक नवीन नेतृत्व म्हणून देखील यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे दादासाहेब पाटील यांच्या पाठीमागे देखील स्थानिक आणि जैन मतदार असल्याची चर्चा आहे. तरही सर्व राजकीय समीकरणे पाहता येथून नेमकं कोण बाजी मारणार याबाबत अद्यापही ठोसपणे सांगता येत नाही. 

Advertisement

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

मतदानाची आकडेवारी 

हातकणंकगले मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 70.28 टक्के मतदान झालं होतं. तर यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा आकडा वाढून 71.11 टक्के झाला आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहेच 

Advertisement
  • शाहूवाडी - 72.92 - टक्के
  • हातकणंगले - 75.32 टक्के 
  • इचलकरंजी - 68.14 टक्के
  • शिरोळ - 73.60 टक्के 
  • इस्लामपूर - 68.43 टक्के
  • शिराळा - 67.39 टक्के

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

आमदारांची ताकद कुणाकडे?

  • शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ - विनय कोरे (जनसुराज्य पक्ष)
  • हातकणंगले विधानसभा मतदारसंघ - राजू आवळे (काँग्रेस)
  • इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ - प्रकाश आवाडे (अपक्ष)
  • शिरोळ विधानसभा मतदारसंघ - राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
  • इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  • शिराळा विधानसभा मतदारसंघ - मानसिंग नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)