लोकसभा अध्यक्षपदावरून पेच फसणार? इंडिया आघाडीनं डाव टाकला

लोकसभा अध्यक्ष कोणाचा होणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. एनडीएचा उमेदवार कोण असणार हे अजुनही निश्चित नाही. तेलगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी या पदावर दावा केल्याची चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभेचे अधिवेशन 24 जून पासून सुरू होणार आहे. तर 26 जूनला लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे. पण लोकसभा अध्यक्ष कोणाचा होणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. एनडीएचा उमेदवार कोण असणार हे अजुनही निश्चित नाही. तेलगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी या पदावर दावा केल्याची चर्चा आहे. तर एनडीएच्या प्रत्येक हालचालींवर इंडिया आघाडीची बारीक नजर आहे. ऐवढेच नाही तर चंद्राबाबूंनी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला तर त्याला इंडिया आघाडी पाठिंबा देईल असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपला पुर्ण बहुमत मिळालेले नाही. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी तेलगू देसम, संयुक्त जनता दलासह छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष निवडताना भाजपला सर्वांना विचारात घेवून अध्यक्ष निवडावा लागणार आहे. अध्यक्षपद हे महत्वाचे पद आहे असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांनी पक्ष फुटीनंतर चुकीचे निर्णय दिले. त्यांनी दिलेला निकाल हा बनावट होता असा आरोपही राऊत यांनी केला. जर लोकसभेचा अध्यक्ष भाजपचा झाला तर ते सर्वात पहिले चंद्राबाबू, नितीश कुमार आणि चिराग पासवान यांचा पक्ष फोडला जाईल असा दावाच राऊत यांनी केला. शिवाय अध्यक्ष महाराष्ट्रा प्रमाणेच निकालही देतील असे ते म्हणाले. अशा स्थितीत चंद्राबाबूंनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर त्याला इंडिया आघाडी चर्चा करून पाठिंबा देईल असेही राऊत यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - NDTV Exclusive:लोकसभेत पराभव, विधानसभेची निवडणूक लढणार का? पंकजा मुंडेंचे उत्तर काय?

राऊत यांच्या दाव्या मुळे भाजपला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विचारपूर्वक पाऊलं टाकावी लागतील. शिवाय लोकसभेत आम्ही आमची ताकद दाखवून देवू असेही राऊत यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही याचा विचार सध्या इंडिया आघाडीत सुरू आहे. मात्र चंद्राबाबूंना पाठिंबा देण्याचे वक्तव्य करून इंडिया आघाडीने भाजपचे टेन्शन मात्र वाढवले आहे. सध्याचे सरकार हे टेकूंच्या आधारावर उभे आहे असे राऊत म्हणाले. दरम्यान आता 2014 आणि 2019 सारखी स्थिती नाहीय विरोधकांची संख्याही सत्ताधाऱ्यां ऐवढीच आहे. अशा वेळी लोकसभेचे उपाध्यक्षपद हे विरोधीपक्षाला मिळायला पाहीजे, असेही राऊत म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - EVM शी जोडलेला होता वायकरांच्या निकटवर्तीयाचा फोन? त्या मोबाइलमुळे खळबळ, दोघांना नोटीस

तेलगू देसम पार्टीने अध्यक्षपद मिळावे अशी मागणी भाजपकडे केल्याचे समजते. याबाबत तेलगू देसमच्या नेत्यांनीही अध्यक्षाची निवड ही सर्वानूमते झाली पाहीजे अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे अध्यक्ष ठरवताना एनडीएच्या मित्रपक्षांना भाजपला विश्वासात घ्यावे लागणार आहे. शिवाय इंडिया आघाडीने टाकलेला डावाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच बरोबर उपाध्यक्षपद हे विरोधकांना देण्याच्या अटीवर अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा पर्याय भाजप समोर असू शकतो. 

Advertisement