Jalgaon News : जळगावात महिला उमेदवाराला शून्य मतं मिळाली का? EVM वर शंका! अखेर गूढ उकललं

Jalgaon Municipal Corporation Result 2026 :  जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर सध्या सोशल मीडियावर एका पोस्टने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jalgaon Municipal Corporation : जळगावमधील व्हायरल पोस्टचं अखेर सत्य उघड झालं आहे.
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon Municipal Corporation Result 2026 :  जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालांनंतर सध्या सोशल मीडियावर एका पोस्टने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एका अपक्ष महिला उमेदवाराला चक्क शून्य मत मिळाल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला असून, यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

उमेदवाराचे स्वतःचे मत नेमके गेले कुठे, असा खोचक सवाल या व्हायरल पोस्टच्या माध्यमातून विचारला जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वत्र ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच काळात जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 क मधील अपक्ष उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांच्या संदर्भातील एक पोस्ट वेगाने पसरली. 

या पोस्टमध्ये सुनंदा फेगडे यांच्या नावापुढे शून्य हा आकडा दाखवण्यात आला होता. एखाद्या उमेदवाराला, ज्याचे स्वतःचे आणि कुटुंबाचे मत असते, त्याला शून्य मत कसे मिळू शकते, अशी चर्चा नेटिझन्समध्ये रंगली होती. या पोस्टमुळे निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही नेटकऱ्यांनी शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.

Advertisement

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा का दिला? मनसे नेत्यांनी सांगितली A to Z कारणं )
 

काय आहे सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्याची पडताळणी केली असता, त्यातील अर्धवट सत्य समोर आले आहे. सुनंदा भागवत फेगडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्या या निवडणुकीत पराभूत झाल्या हे खरे आहे. मात्र, त्यांना शून्य मतदान पडल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये जो शून्य आकडा दिसत आहे, तो केवळ टपाली म्हणजेच पोस्टल बॅलेटचा आहे. सुनंदा फेगडे यांना टपाली मतदानात एकही मत मिळाले नाही, हे तांत्रिकदृष्ट्या सत्य असले तरी ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीत त्यांना एकूण 92 मतं मिळाली आहेत.

Advertisement


निवडणुकीच्या काळात अनेकदा ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले जातात. निवडणूक आयोगाकडून वारंवार या मशीन सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. जळगावच्या या प्रकरणात केवळ टपाली मतदानाचा आकडा पकडून संपूर्ण निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

कोणत्याही संदर्भाशिवाय आणि अपूर्ण माहितीच्या आधारावर ही पोस्ट शेअर करण्यात आल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरला होता. प्रत्यक्षात 92 मतं मिळालेली असताना केवळ शून्य मताची माहिती पसरवणे हे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement