रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी

Jalna Lok Sabha Election Result : महाराष्ट्रातील भाजपाच्या सुरक्षित मतदारसंघात जालनाचा समावेश होता. यंदाही दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी सर्वांची अपेक्षा होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
रावसाहेब दानवेंच्या पराभावचं खरं कारण काय?
जालना:

Jalna Lok Sabha Election 2024 Result : मावळत्या लोकसभेतील महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ खासदारांमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा समावेश होता. दानवे मागील पाच निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महाराष्ट्रातील भाजपाच्या सुरक्षित मतदारसंघात जालनाचा समावेश होता. यंदाही दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी सर्वांची अपेक्षा होती.

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मतमोजणी सुरु झाली आणि हे सर्व अंदाज फोल ठरले. रावसाहेब दानवे आणि काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्यात सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार लढत झाली. सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये ही लढत चुरशीची होती. आघाडीचं पारडं दोन्ही बाजूंनी झुकत होतं. पण, दुपारनंतर हे चित्र बदललं. निवडणूक आयोगाच्या ताज्या अपडेटनुसार कल्याण काळे यांनी राबसाहेब दानवे यांच्यावर 99 हजार 279 मतांची विजयी आघाडी घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या पराभवाचं कारण काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

( नक्की वाचा : पुण्यात भाजपाचाच कारभारी, धंगेकरांना धोबीपछाड देत मोहोळ विजयाचे मानकरी )
 

दानवेंच्या पराभवाचं कारण?

जालना मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी 1 लाख 42 हजार मतं घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. दानवे आणि काळे यांच्यातील अंतरापेक्षा साबळे यांना अधिक मतं मिळाली आहेत. त्यांना मिळालेली ही मतं दानवेंच्या पराभवाचं कारण ठरली आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : वडिलांच्या अपयशाची लेकीकडून परतफेड, पक्षाचा बालेकिल्ला परत मिळवला )
 

जालना जिल्हा मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या अंदोलाचे नेते मनोज जरांगे पाटील हे याच जिल्ह्यातले आहेत. जरांगे यांचं अंतरवली सराटी हे गाव जालना लोकसभा मतदारसंघातच येतं. साबळे हे मराठा आरक्षण आंदोलनाचेच नेते आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी स्वत:चीच कार पेटवली होती. त्यामुळे साबळे चर्चेत आले होते. त्यांच्या उमेदवारीला मराठा समाजातील काही नेत्यांचाच विरोध होता.  पण, या विरोधानंतरही त्यांनी 1 लाख 40 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत. त्यांची ही मतंच दानवेंच्या पराभवात निर्णायक ठरली आहेत.