मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची जाहीर सभा कोल्हापूरात झाली. महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा या सभेच्या माध्यमातून झाला. यासभे वेळी एकनाथ शिंदे यांनी 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या घोषणांची अंमलबजावणी केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले. यात शेतकऱ्यांना कर्ज माफी ते लाडकी बहीणीच्या पैशांत वाढ या घोषणाचा समावेश आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली आहे. त्यात लाडकी बहीण योजनेच्या पैशात सत्ता आल्यास वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या 1500 रूपये दिले जातात. त्यात वाढ करून 2100 रूपये दर महिन्याला देणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर 25 हजार महिलांची भरती पोलिस दलात केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्नान योजनेच्या रक्कम मध्ये ही वाढ केली जाईल. सध्या 12 हजार दिले जातात. ते 15000 करण्यात येईल.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
त्याच बरोबर हमीभावावर 20 टक्के अनुदान देणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार. वृद्धांच्या पेन्शन धारकाना 1500 ऐवजी 2100 रूपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी पाच जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या होत्या. त्याच पद्धतीने महायुतीचे सरकार आल्यास या वस्तूंचा भाव स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात 25 रोजगार निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 45 हजार गावात पाणधन रस्ते बांधणार. शिवाय अंगणवाडी आणि आशा सेविकांना दरमहा 15 हजार देण्याची घोषणा शिंदे यांनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे वीज बिलात 30 टक्के कपात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात 2029 चे महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल हे सर्वां समोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ ट्रेलर आहे पिक्टर अभी बाकी आहे असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ही दहा वचंन आम्ही सरकार आल्यानंतर पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार, शेतकरी आणि महिलावर या दहा वचनात महत्व देण्यात आले आहेत.