मतमोजणीच्या दिवशी 'या' एक्झिट पोलचं भाकीत पाहिल्यानंतर सगळेच चकीत झाले

बहुतांश एक्झिट पोल्सनुसार दहा वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट कायम राहील असा अंदाज जाहीर करण्यात आला. काही एक्झिट पोलमध्ये 2019 मधील एनडीएचा 350 चा आकडा यंदाच्या निवडणुकीत एनडीए पार करेल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. 

Advertisement
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध संस्थांकडून एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले. एक्झिट पोल्समध्ये एनडीएला 353 ते 415  जागा मिळतील असे बहुतेकांनी भाकीत वर्तवले होते. बहुतांश एक्झिट पोल्सनुसार दहा वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट कायम राहील असा अंदाज जाहीर करण्यात आला. काही एक्झिट पोलमध्ये 2019 मधील एनडीएचा 350 चा आकडा यंदाच्या निवडणुकीत एनडीए पार करेल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. 

(नक्की वाचा- उत्तर महाराष्ट्रात वारं फिरलं! महाविकास आघाडीची मोठी मुसंडी)

एक्झिट पोल्सचा एकत्रित परिणाम पोल ऑफ पोल्सनुसार, एनडीए 365 पर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज होता.  पूर्वेत आणि दक्षिणेत भाजपला आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळेल,  बंगालमध्ये भाजपला अधिक जागा मिळू शकतील असाही अंदाज वर्तवण्यात आला होता.   दिल्ली, राजस्थान, बिहारमध्ये भाजपच्या उमेदवारांची संख्या घटेल असाही अंदाज होता. 

(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)

एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या पूर्व आणि दक्षिणेत भाजप मजबूतपणे वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. पोल्सनुसार, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटकमध्ये झालेली भाजपची घट पूर्व आणि दक्षिणेतून पूर्ण होईल असे भाकीत होते. 

(नक्की वाचा- सांगलीतील 'भरकटलेलं विमान' दिल्लीत पोहोचलं; विशाल पाटलांचा मविआ, महायुतीला दणका)

प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास एका एक्झिट पोलच्या आकड्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप 300 पार जाईल आणि एनडीए 350 पर्यंत जाईल अशी भाकिते वर्तवले जात असताना एबीएन तेलुगूने अंदाज प्रसिद्ध केला होता की एनडीएला 292 आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी पाचपर्यंत भाजपचे 293 उमेदवार आघाडीवर होते तर इंडियाचे 228 उमेदवार आघाडीवर होते. एबीएन तेलुगूच्या एक्झिट पोलच्या भाकितामध्ये इतरांना 17 जागा मिळतील असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मतमोजणीच्या दिवशी 'इतर'च्या रकान्यात  22 उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले.

Advertisement
Topics mentioned in this article