लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचे सरकार येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. असं असलं तरी भाजपला हमखास निवडून येणाऱ्या अनेक जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. त्या जागांवर आता भाजपकडून मंथन सुरू आहे. त्या पैकीच एक जागा आहे ती फैजाबाद लोकसभेची. याच लोकसभा मतदार संघात रामाची अयोध्या येते. ज्या ठिकाणी आता राम मंदिर आहे. भाजपने मांडलेल्या गणितानुसार या मतदार संघातून मोठ्या विजयाचा दावा केला गेला होता. मात्र प्रत्यक्षात झाले उलटे. भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे जावे लागले. भाजपचा या मतदार संघात पराभव का झाला? त्यामागची कारणे काय होती तेच आपण पाहाणार आहोत.
ही लोकसभा जागा हरल्यानंतर भाजपात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. रामाच्याच नगरीत पराभव झालाच कसा असा प्रश्न विचारला जात आहे. राम मंदिराच्या उद्घाटना नंतर भाजपने देशभरात एक व्यापक अभियान राबवलं होतं. विशेष म्हणजे फैजाबाद लोकसभेतील पाच विधानसभा मतदार संघा पैकी चार विधानसभेत भाजपच पिछाडीवर होती. त्यात अयोध्येचाही समावेशी आहे.
समाजवादी पार्टीचा मोठा डावा
फैजाबाद लोकसभेत भाजपच्या पराभवा मागे समाजवादी पार्टीच्या रणनीतीचा एक मोठा भाग आहे. समाजवादी पार्टीने मागास, दलित आणि अल्पसंख्यांकाची मोट या मतदार संघात बांधली. त्यानुसार रणनितीही आखली. या रणनिती नुसारच अवधेश प्रसाद यांना निवडणूक रिंगणात उतरवलं गेले. अवधेश प्रसाद हे अनुसूचित जातीच्या पासी समाजाचे आहेत. याच अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या विद्यमान खासदार लल्लू सिंह यांना 55 हजार पेक्षा जास्त मतांना हरवले आहे. लल्लू सिंह यांच्या विरोधात असलेले लाट या पराभवालाही एक कारण ठरली आहे.
1957 नंतर पहिल्यांदाच मिळाला SC उमेदवार
फैजाबाद लोकसभेची ही निवडणूक अनेक ऐतिहासीक रेकॉर्डसाठी लक्षात ठेवली जाईल. या लोकसभेतून विजयी झालेले अवधेश प्रसाद 1957 नंतर पहिले असे खासदार आहेत जे अनुसूचित जातीचे आहेत. भाजपने या मतदार संघात रामाच्या नावाने मते मागितली. मात्र जनतेने त्यांना पुर्ण पणे नाकारले आहे.
अयोध्येत विकासाचा मुद्दा ही पडला मागे
भारतीय जनता पार्टीने उत्तर भारतात राम मंदिर आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली. फैजाबादमध्ये राम मंदिरा बरोबरच अयोध्येत केलेल्या विकास कामांवरही मते मागितली गेली. तर समाजवादी पार्टीने मागास, दलित आणि अल्पसंख्यांक यांना एकत्र केले. शेवटी समाजवादी पार्टीलाच जनतेने आशिर्वाद दिला.
स्थानिक लोकांमध्ये होता असंतोष
अयोध्येत मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. त्यामुळे अयोध्येची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. या आधी कधी झाले नाही ते आता अयोध्येत होत आहे असे जगाला वाटले असेल. मात्र अयोध्येत जे लोक रहातात त्यांना याबाबत विचारे तर त्यांचे मत काही वेगळेच आहे. जो विकास झाला त्यामुळे स्थानिकांना जो त्रास झाला तो न सांगण्या सारखा आहे अशी त्यांची भावना आहे. त्रास होणारा विकास कशाला असा प्रश्नही ते करत आहेत. शिवाय हा त्रास एक दिवसाचा नव्हता तर तो रोजचा होता असेही ते सांगतात.
राम मंदिर झाल्यानंतर अयोध्या शहरात जागोजागी बॅरिकेटींग, पोलिस बंदोबस्त, रूट डायव्हर्जन, आणि व्हीआयपी कल्चर आले. त्याचा मोठा फटका स्थानिकांना बसला. त्याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला. अयोध्ये राम मंदिर झाल्यानंतर इथल्या जमिनीच्या किंमती या गगनाला भिडल्या. त्यामुळे स्थानिक प्रसासन शहराच्या विस्तारी करणासाठी शहराच्या बाहेरील सुपिक जमीनही ताब्यात घेत आहे. ही बाब स्थानिक लोकांनाही आवडली नाही. याचाही मोठा फटका या निवडणुकीत भाजपला बसला अशी चर्चा आहे.