सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायाधीश आणि एका वरिष्ठ पत्रकारानी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सार्वजनिक चर्चा करण्यासाठी एका स्टेजवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्विकारलं आहे. पण, राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत तर त्यांच्याशी चर्चा का? असा प्रश्न भाजपानं विचारला होता. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे प्रमुख तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची एका नेत्याचं नाव निश्चित केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून सार्वजनिक चर्चेसाठी भाजपाकडून अभिनव प्रकाश यांचं नाव दिलं आहे. प्रकाश भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून दिल्लीतील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. तेजस्वी सूर्या यांनी एक्सवर ही लिहलंय,'प्रिय राहुल गांधी, भारतीय जनता युवा मोर्चानं तुमच्यासोबत चर्चेसाठी आमचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना नियुक्त केलंय. अभिनव प्रकाश हे पासी (एसी) जमातीचे तरुण आणि शिक्षित नेता आहेत. त्यांच्या समुदायाची रायबरेलीमध्ये जवळपास 30 टक्के लोकसंख्या आहे. एक राजकीय वारसदार आणि सर्वसमान्य तरुण यांच्यात समृद्ध चर्चा होईल.'
( नक्की वाचा : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार खडाजंगी? आमने-सामने मुकाबल्यासाठी काँग्रेस तयार )
सूर्या यांनी पुढं लिहलंय, 'या मतदारसंघाचं तुमच्या कुटुंबानं दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलंय. त्याचबरोबर तुम्ही तिथं सध्या विद्यमान उमेदवार आहात.' सूर्या यांनी अभिनव प्रकाश यांच्याबद्दल लिहिलं आहे की, 'ते फक्त आमच्या युवा शाखेचे मुख्य नेता नसून आमच्या सरकारनं लागू केलेल्या धोरणांचे प्रमुख प्रवक्ते आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि दिल्ली विद्यापीठातील रामजस कॉलेजमध्ये ते अर्शशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉर्मसमध्ये शिकवलं आहे. सामाजिक, अर्थिक आणि राजकीय विषयातील त्यांची गती आणि समज असून ते ही चर्चा समृद्ध करण्यासाठी सक्षम आहेत.'
अभिनव प्रकाश यांनी तेजस्वी सूर्या यांचे आभार मानले आहेत. 'मला या चर्चेसाठी नियुक्त केल्याबद्दल तेजस्वी सूर्या यांचे आभार. मी या चर्चेची वाट पाहात आहे. मी उत्तर प्रदेशातील आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबानं दीर्घकाळ या राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. तुम्ही अमेठीमधून पळाला तसं या चर्चेतून पळ काढणार नाही, अशी आशा आहे.'