2 निवडणुकांनंतर काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, कोणत्या राज्यांनी दिला राहुल गांधींना 'हात'?

Lok Sabha Elections 2024 Result : 2014 आणि 2019 मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस 100 जागांच्या जवळ पोहोचलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी (Lok sabha election 2024)  सुरु आहे. आत्तापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस पक्षाला मोठा फायदा मिळालेला दिसतोय. 2014 आणि 2019 मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस 100 जागांच्या जवळ पोहोचलीय. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 206 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला अनेक राज्यांमध्ये मोठं यश मिळालंय.

( नक्की वाचा : महाराष्ट्राची गॅरेंटी कुणाला? वाचा तुमच्या मतदारसंघातील संपूर्ण विश्लेषण )
 

2014 मध्ये काय झालं?

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत मोदी लाटेचा काँग्रेसला जबरदस्त फटका बसला. या निवडणुकीत काँग्रेसच्या तब्बल 162 जागा कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर पक्षाची जवळपास 9.8 टक्के मतं कमी झाली होती. त्या निवडणुकीत भाजपानं हिंदी भाषिक राज्यात दणदणीत कामगिरी केली होती. त्याचबरोबर गुजरात आणि महाराष्ट्रातही भाजपानं मोठं यश मिळवलं होतं. भाजपाच्या या यशाचा थेट फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या होत्या.

( नक्की वाचा : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे? )
 

2019 मध्ये काय झालं?

2019 साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट कायम होती. या निवडणुकीत भाजपानं हिंदी भाषिक राज्य, गुजरात आणि महाराष्ट्रानं भाजपाला साथ दिली. बंगालमध्येही पक्षाची कामगिरी सुधारली. त्यामुळे भाजपानं पहिल्यांदाच 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 52 जागांवरच विजय मिळवता आला होता.

( नक्की वाचा : मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाला 1 जागा, 'हे' कसं घडलं? )
 

कोणत्या राज्यांची काँग्रेसला साथ?

काँग्रेसनं 2024 च्या निवडणुकीत स्वत:च्या कामगिरीत सुधारणा केली. भाजपा विरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी करण्याचा पक्षाला फायदा झाला. महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी सुधारली. त्याचबरोबर कर्नाटक आणि राजस्थान या या राज्यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. त्या राज्यातही काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीय.  
 

Advertisement