Explainer : मतदानाच्या टक्केवारीचा वाद, 1.07 कोटी मते कशी वाढली?

निवडणूक आयोगाच्या 4 टप्प्यातील ताज्या आकडेवारीत 1.07 कोटी मतांची वाढ झाली आहे, ज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

देशात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे (लोकसभा निवडणूक 2024) पूर्ण झाले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकड्यांवरून वाद सुरू आहे. मतदानाच्या टक्केवारीत छेडछाड केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. निवडणूक आयोगाच्या 4 टप्प्यातील ताज्या आकडेवारीत 1.07 कोटी मतांची वाढ झाली आहे, ज्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मतदानानंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली?

मतदानानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याबद्दल असोसिएशन फॉर 'डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ' संस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. ईव्हीएम बदलली असल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आयोगाकडून 24 मेपर्यंत उत्तरे मागवली आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला  आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सदर याचिका सुनावणीसाठी आली आहे. असोसिएशन फॉर 'डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स 'ने मागणी केली होती की न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत की मतदान संपल्याच्या 48 तासांच्या आत मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करावी. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ही आकडेवारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आयोगाला अडचण काय आहे? यावर आयोगाच्या वकिलांनी म्हटले होते की बरीच माहिती गोळा करून ती अपलोड करण्यासाठी वेळ लागतो. 

Advertisement

एडीआरने आपल्या याचिकेत म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीची अंदाजित आकडेवारी निवडणूक आयोगाने 30 एप्रिल रोजी जाहीर केली होती. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 11 दिवसांनी आणि 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर चार दिवसांनी निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या 30 एप्रिलच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मतदानाच्या टक्केवारीत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

( वाचा - मविआ किती जागा जिंकणार? खरगे- ठाकरेंचे आकडे वेगवेगळे, पवारांचा अंदाज काय?)

निवडणूक आयोगाचे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एडीआरचे वकील प्रशांत भूषण यांच्या सगळ्या शंकांचे निरसन केले आहे. त्यांनी असे म्हटले की या याचिका निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठीचा प्रयत्न आहे. सिंग यांनी हे देखील सांगितले की मतदानाचे आतापर्यंतचे सगळे टप्पे सुरळीतपणे पार पडले आहेत. 

Advertisement

निवडणूक आयोगाचे वकील सिंग यांनी प्रशांत भूषण यांच्या याचिकेला विशेष प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हटलं होतं. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटले की, न्यायालयाला वाटले की एखाद्या मुद्दावर न्यायालयाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे तर न्यायालय ती भूमिका कोणत्याही स्थितीत पार पाडेल. गरज वाटली तर आम्ही रात्रभरही बसू असे न्यायालयाने म्हटले. 

EC च्या अद्ययावत आकडेवारीत  किती फरक आहे?

निवडणूक आयोगाच्या 4 टप्प्यातील अद्ययावत मतदानात 1.07 कोटी मतांची वाढ दिसून आली आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी रात्री उशीरा निवडणूक आयोगाने आकडे जारी केले होते. ते आकडे आणि अंतिम अद्ययावत आकड्यांमध्ये 1.07 कोटी मतांचा फरक आहे. 379 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले असून या प्रत्येक मतदारसंघातील मतदानाचा आकडा सरासरी 28 हजाराने  वाढलाय. 

(वाचा - साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?)

या सगळ्यातील तथ्य शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा असे दिसून आले की, निवडणूक आयोग प्रत्येक टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अॅपवर अपडेट करत असते. प्रत्येच टप्प्यातील मतदानाचा आकडा त्या मतदानाच्या दिवशी रात्री 10.30 ते 11 पर्यंतचा असतो. अॅपवर ही आकडेवारी अपलोड करताना निवडणूक आयोग अंदाजे आकडेवारी असे नमूद करत असतो. या मतांमध्ये टपाली मतांचा समावेश नसतो. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानाचे  अंतिम आकडे 11 दिवसांनी तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील आकडे 4 दिवसांनंतर जारी केले होते. 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली अंतिम आकडेवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशीरा जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा थोडी वेगळी आहे. अनेक राज्यांमध्ये मतदानाच्या रात्री जारी करण्यात आलेल्या आकड्यांपेक्षा अंतिम आकडे वेगळे होते. मतदानाच्या रात्री प्रसिद्ध करण्यात आलेले आकडे आणि अद्ययावत आकडेवारीत फरक आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 18.6 लाख, दुसऱ्या टप्प्यात 32.2 लाख, तिसऱ्या टप्प्यात 22.1 लाख आणि चौथ्या टप्प्यात 33.9 लाख मतांचा फरक होता.

अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक दिवस लागले आणि मागील लोकसभा निवडणुकांप्रमाणे प्रत्येक टप्प्यानंतर नेमकी किती मते पडली हे जाहीर केले नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास विलंब झाल्याचा इन्कार केला आहे.

निवडणूक आयोगाने यंदा पत्रकार परिषद घेतली नाही. याऐवजी त्यांनी लेखी उत्तरे जारी केली आहेत. मतदानाच्या आकडेवारीत हेराफेरी करता येऊ शकत नाही, असे आयोगाने म्हटले आहे.  माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनीही हीच बाब नमूद केली आहे. "प्रणालीत मतदारांच्या मतदानाच्या आकड्यांमध्ये फेरफार करण्यास वाव नाही. यापूर्वी देखील मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यांच्यात फरक होता. कारण ही आकडेवारी अद्ययावत केली जाते. हे सांगतानाच लवासा यांनी म्हटले की, आयोगाने आकडेवारी गरजेच्या सूचनेसह सार्वजनिक मंचावर जाहीर करण्यास काहीच हरकत नाहीये. ही आकडेवारी जनतेसमोर मांडल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. जितकी अधिक पारदर्शकता असेल तितका लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. 

वरून अंतिम मतदानाचा डेटा बदलला जात असल्याने तो अपडेट केला जात होता." तथापि, त्यांनी TOI ला सांगितले की निवडणूक आयोगाने सावधगिरीने सार्वजनिक डोमेनमध्ये अचूक डेटा ठेवण्यास संकोच करू नये. ते शेअर करण्यात काय नुकसान आहे? यामुळे कोणतीही हानी कशी होते? ते म्हणाले की अधिक पारदर्शकता म्हणजे अधिक विश्वास.

Topics mentioned in this article