विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पराभव स्विकारला आहे. पण त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. तो जरी पटत नसला तरी निकाल लागला आहे. मात्र तो असा कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. ज्यांनी मविआला मतं दिली त्यांना धन्यवाद देतो. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या निवडणुकीचा निकाल पाहील्यानंतर ही लाट नाही तर त्सुनामी असल्याचे दिसत आहे. हे सर्व सामान्य जनतेला पटतय का नाही हा खरा प्रश्न आहे. जे आकडे समोर दिसत आहेत ते पाहिल्यानंतर असं वाटतयं की यांना सभागृहाचे काम करण्यासाठी आता विरोधकांची गरजच नाही. विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही अशीच भाजपची भूमीका दिसतेय. हा निकाला बारकाईने पाहील्यानंतर अनेक प्रश्न पडत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?
प्रचाराच्या दरम्यान संपूर्ण राज्यात फिरलो. त्यावेळी मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. असं असतानाही लोकांनी महायुतीला मतं का दिली असा प्रश्न आहे. महिला असुरक्षित आहेत म्हणून मतं दिली? सोयाबीनला भाव नाही म्हणून मतं दिली? कापूस विकत घेतला जात नाही म्हणून मतं दिली? काय कारण आहे ज्यामुळे हे मतदान झाले असा प्रश्न त्यांनी केला आहे. या मागचं गुपीत आता शोधावं लागणार आहे. काही जणाचं म्हणणं आहे महाराष्ट्रात ईव्हीएमचा विजय झाला आहे. जनतेला हा निकाल मान्य आहे का? तो जर मान्य असेल तर काही हरकत नाही असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर
पण या पुढच्या काळात आपण महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू. आम्ही प्रामाणिक पणे निवडणूक लढलो ही चुक केली का असं वाततयं असं ही ते म्हणाले. कोरोना काळात कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राला सांभाळलं. तो महाराष्ट्र असा वागेल यावर माझा विश्वास नाही असंही ते म्हणाले. महागाईचा प्रश्न होता. उद्योग राज्या बाहेर जात होते. बेरोजगारीने लोक हैराण होते. असं असताना असा निकाल कसा लागतो असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर
आता निकाल लागले आहे. ते जिंकले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. आता त्यांनी तातडीने लाडक्या बहिणांना 2100 रूपये खात्यात टाकावेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. जी आश्वासने दिली आहेत त्याची पुर्तता करावी. आता तरी सच्चा भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान मविआच्या कोणत्याही नेत्या बरोबर बोलणे झालेले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.