एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणारे उमेदवार कोण? यादीत कोणाची नावं?

जिथे काही उमेदवार निसटत्या फरकाने विजयी होत होते. त्यावेळी काही उमेदवार हे जोरदार मुसंडी मारत लाखभर मतांनी विजयी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतीने बंपर विजय मिळवला आहे. या विजयामुळे राज्यात महायुतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट आहे. या विजयात असे काही उमेदवार आहेत ज्यांची चर्चा राज्यात होता आहे. या उमेदवारांनी एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे. जिथे काही उमेदवार निसटत्या फरकाने विजयी होत होते. त्यावेळी काही उमेदवार हे जोरदार मुसंडी मारत लाखभर मतांनी विजयी झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक लाखा पेक्षा जास्त मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातून रेकॉर्डब्रेक मताधिक्यासह विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवाजी शरद पवार पक्षाजे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजारा पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 

ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?

या यादीत दुसरं नाव आहे ते काशिराम पावरा यांचं. काशिराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी या मतदार संघातून 1 लाख 45 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर

भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनीही सातारा विधानसभा मतदार संघातून एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे. शिवेंद्रराजे यांनी 1 लाख 42 हजाराच्या मताधिक्याने ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव केला आहे. त्याच प्रमाणे अजित पवार यांनीही बारामतीतून एक लाखा पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युगेंद्र पवार यांचा 1 लाख 899 मतांनी पराभव केला आहे.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर

विदर्भातल्या मेळघात विधानसभा मतदार संघातून भाजपच्या केवलराम काळे यांनी ही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. केवलराम काळे यांना 1 लाख 6 हजार मताधिक्य मिळाले आहे. येवढ्या मतांनी त्यांनी काँग्रेसच्या हेमंत चिमोटे यांचा पराभव केला आहे. त्याच बरोबर बागलाण विधानसभा मतदार संघातून भाजपच्या दिलीप बोरसे यांनीही  1 लाख 29 हजार 297 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिपीका चव्हाण यांचा पराभव केला.