भाजपला दिलासा! 'या' मतदार संघातलं बंड शमलं, देशमुखांसाठी महाडिकांची माघार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईनंतर सम्राट महाडिकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

विधानसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडी असो की महायुती असो प्रत्येकाला बंडखोरांचा सामना करावा लागतोय. या बंडखोरांना शांत करण्यासाठी सध्या मोहीम उघडण्यात आली आहे. पक्षाचे जेष्ट नेते बंडखोरांची समजूत काढण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यात काहींची समजूत काढण्यात यश येत आहे, तर काही ठिकाणी अपयश येत आहे. मात्र भाजपला एक दिलासा देणारी एक घटना घडली आहे. सांगलीच्या शिराळा मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. हे बंड थंड करण्यात पक्षाला यश आलं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगलीच्या शिराळा मतदारसंघातलं भाजपातलं बंड अखेर थंड झाले आहे. सम्राट महाडिक यांनी या मतदार संघात बंडखोरी करत भाजपचे टेन्शन वाढवले होते. अखेर त्यांचे बंड थंड करण्यात भाजपाला यश आलं आहे. सम्राट महाडीक यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर शिराळा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी -  मनसेची बदलती भूमिका अन् 2024 ची निवडणूक! राज ठाकरेंनी काय काय केलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईनंतर सम्राट महाडिकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेणार असल्याचेही सांगितले आहे. शिवाय सत्यजित देशमुखांचा प्रचारही करणार आहे. ते आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून सर्वांनी देशमुखांचा प्रचार करावा असे आवाहन ही करणार आहेत. शिराळा मतदारसंघातले भाजपाचं बंड शमल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध भाजप अशी एकास एक लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - दादांची आबांवर टीका, शरद पवार पहिल्यांदाच बोलले, अजित पवारांना थेट सुनावले

2019 च्या निवडणुकीत भाजपने शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिली होती. तर त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता. इथून राष्ट्रवादीचे उमेदवार मनासिंग नाईक हे विजयी झाले होते. मानसिंग नाईक यांना जवळपास 1 लाख मतं मिळाली होती.तर भाजपचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नाईक यांना 76 हजार मतं मिळाली होती. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले सम्राट महाडिक यांना तब्बल 46 हजार मतं मिळाली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - "एकनाथ शिंदे संकुचित विचारांचे", मनसेची माहीमच्या जागेवरून टीका

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना आघाडी मिळाली होती. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशिल माने हे पिछाडीवर होते. त्यामुळे विधानसभेला आता ही आघाडी तोडण्याचे आव्हान महायुतीच्या उमेदवाराचे असणार आहे. त्यात सम्राट महाडिकांनी माघार घेतल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे.  

Advertisement