Nilesh Rane: निलेश राणेंची भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड, नोटांनी भरलेली बॅग पकडली, घरातच राडा

ज्यांच्या घरात ही रक्कम आढळली ते विजय केनवडेकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

गुरूप्रसाद दळवी 

मालवण नगरपरिषद निवडणुकीच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालवण नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचीच कोंडी केल्याचे चित्र पाहायला भेटत आहे. त्यांनी आधी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचं पुराव्याने समोर आणलं होतं. तो वाद शमत नाही तोच आमदार निलेश राणे यांनी आज गुरूवारी भाजपच्या मालवणमधील एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली. त्या धाडीत त्यांना मोठ्या रक्कमेची पैशांची ब्याग आढळून आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 
   
विजय केनवडेकर हे भाजपचे मालवणमधील पदाधिकारी आहेत. त्यांच्या घरी निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह धडकले. अचानक निलेश राणे आल्याने तिथे असलेल्या विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत या भाजप कार्यकर्त्यांची धावपळ झाली. निलेश राणे यांनी मी कुणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही. जे काय आत आहे ते बाहेर आणा असं सांगितलं. त्यानंतर राणेंना कार्यकर्ते बेडरूममध्ये घेवून गेले. त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग आढळली. पाचशे रूपयांची बंडल त्यात दिसली. ती एक मोठी रक्कम असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. 

नक्की वाचा - Sindhudurg News: राणेंनी डाव टाकला! मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, कोण चेकमेट होणार?

ज्यांच्या घरात ही रक्कम आढळली ते विजय केनवडेकर हे भाजपचे पदाधिकारी आहे. त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सोबत फोटो आहे. तो ही निलेश राणे यांनी यावेळी माध्यमांना दाखवला. त्यावर निलेश राणे यांनी त्याच वेळी स्थानिक पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनाही याची कल्पना दिली. शिवाय हे पैसे जप्त करून कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय हे इतकेच पैसे नाहीत कर अजून पैसे घरात असल्याचा दावा निलेश राणे यांनी यावेळी केला. त्या पैशांचा पोलीसांनी शोध घ्यावा असं ही निलेश राणे म्हणाले. 

नक्की वाचा - Hingoli News: भाजप- शिंदे सेनेच्या आमदारांनी एकमेकांची लक्तरं वेशीवर टांगली, टोकाचे आरोप करत सर्वच काढलं

मालवणमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आले आहेत अशी आपली माहिती आहे.  हे काही ऐवढेच पैसे नाहीत. अजून पैसे आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. मालवणमधील आठ ते दहा घरांत पैसे ठेवले आहेत. तिथून पैशांचे वाटप होत आहे असा आरोप त्यांनी केला. पैसे मोठ्या प्रमाणात आले आहेत. हे पैसे चव्हाणांच्या मार्फतच आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. आम्ही धाड टाकल्यानंतर बंड्या सावंत यांनी काही तरी गडबड करण्याचा प्रयत्न केला होता. असं ही ते म्हणाले. या धाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.