कशी असेल पीएम मोदींची नवी टीम, कोण कोण होणार मंत्री? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

एम मोदींच्या नव्या टीममध्ये कोण असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. (PM Modi New Cabinet) कोण मंत्री होणार ? पुन्हा जुन्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळेल की, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi 3.0) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. देशविदेशातील मोठमोठे नेते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील. यादरम्यान पीएम मोदींच्या नव्या टीममध्ये कोण असेल, याबाबत चर्चा सुरू आहे. (PM Modi New Cabinet) कोण मंत्री होणार ? पुन्हा जुन्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळेल की, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. अद्याप याबाबत अधिकृत चर्चा झालेली नाही, मात्र काही अंदाज व्यक्त केले जात आहेत.  

मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोण होणार मंत्री?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या घटकपक्षांच्या कोणत्या जागा दिल्या जातील याबाबत चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. शुक्रवारी दुपारी पंतप्रधान मोदींना एनडीए संसदीय दलाचा नेता म्हणून निवड केल्यानंतर घटकपक्षांच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल. सरकार स्थापनेदरम्यान घटक पक्षांनी काही मागण्या समोर ठेवल्या आहेत. आता भाजपला त्या मागण्या दुर्लक्षित करता येणार नाही. घटक पक्षांना नाराज करणं भाजपला परवडणारं नाही. त्यामुळे कॅबिनेटची उभारणीही अशाच प्रकारे करावी लागणार आहे. 

भाजपसोबत असलेले महत्त्वाचे घटकपक्ष जेडीयू आणि टीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटकपक्षांना किती जागा आणि मंत्रिपदं दिली जातील, याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पंतप्रधान याबाबत निर्णय घेणार असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून समोर आलं आहे.  

पंतप्रधान मोदींच्या शपथ विधीदरम्यान कोण होणार सामील?
यादरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींच्या शपथविधीदरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू भारतात येणार आहेत. त्यांनी भारताचं आमंत्रण स्वीकारलं आहे. दक्षिण आशियातील नेत्यांशिवाय बांग्लादेशाचे पंतप्रधान शेख हसीनास श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, नेपाळी पंतप्रधान प्रधान मंत्री पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सामील होणार आहेत. चीनच्या जवळचे मानले जाणारे मुइज्जू यांच्या नेतृत्वात मालदिवसह द्विपक्षीय संबंध आधीच कमकुवत होत आहेत. त्यामुळे त्यांचं शपथ विधीला येण्यामुळे चर्चा सुरू आहे. 

Advertisement