लेकीसाठी बाप मैदानात! 'पुढच्या निवडणुकीत मी असेल नसेल..', एकनाथ खडसेंची भावनिक साद

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान एकनाथ खडसे यांनी जनतेकडे आपली कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी अपील केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

महाराष्ट्रात भाजपची पाळंमुळं रोवणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse Emotional appeal) यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघांतून सहा वेळा आमदार म्हणून निवडले गेलेले एकनाथ खडसे यांनी यंदाच्या निवडणुकीत कन्या रोहिणी खडसे यांना जिंकवून देण्यासाठी जनतेकडे अपील केलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - रोहित पवार भावी मंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; जाहीर सभेत शब्द दिला

एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत रावेरमधून विजयी झाल्यानंतर रक्षा खडसे यांना मोदी 3.0 मध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत आहेत. त्यांची कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटाकडून मैदानात उतरल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती आणि यात त्यांना पराभव पाहावा लागला होता. 

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खडसेंची भावनिक साद...
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान एकनाथ खडसे यांनी जनतेकडे आपली कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी अपील केलं आहे. लेकीला निवडून आणण्यासाठी त्यांनी मतदारांकडे भावनिक साद दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या राजकारणात मी चांगल्या-वाईट परिस्थितीत जात-धर्म न पाहता मदत केली आहे. सध्या माझी प्रकृती ठीक नसते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल किंवा नसेल. मला जसं आपण सहकार्य केलं तसंच रोहिणी खडसे यांना सहकार्य करावं. यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा माझा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे मी आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही मला सहकार्य केलं आहे. कोणताही जात धर्म न पाहता सर्वांना मदत करण्याची भूमिका मी आजपर्यंत पार पाडली आहे. तब्येतीमुळे पुढची निवडणूक मी पाहिल किंवा नाही. 
 

Advertisement