BMC Election 2026: सेलिब्रेटी पडले घराबाहेर! मत हक्क बजावलेल्या मराठी- हिंदी कलाकारांची पाहा संपूर्ण यादी

सेलिब्रेटी, बडे नेते यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व सामान्य ही मतदानासाठी बाहेर पडत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबई महापालिका निवडणुकीत बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला आहे
  • जुहू भागातील मतदान केंद्रावर अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यांनी जनतेला मतदानासाठी प्रोत्साहित केले आहे
  • सुनिल शेट्टी, जॉन इब्राहीम, हेमा मालिनी, अक्षय कुमार, तमन्ना भाटिया यांसह अनेक कलाकारांनी मतदान केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यासाठी मुंबईकर मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. यात आता सिलेब्रेटी ही मागे नाहीत. मुंबईत बॉलिवूडचे कलाकार राहातात. त्यांनी घराबाहेर पडत आपला मत हक्क बजावला. मराठी कलाकारही यात होते. सर्वांनी मतदान करा असे आवाहन यावेळी या कलाकारांनी केले आहे. मुंबईतल्या जूहू भागात मोठ्या प्रमाणात कलाकार राहातात. त्यामुळे इथल्या मतदान केंद्रावर या कलाकारांची झलक पाहण्यासाठी मिळाली. त्यांनी आपला मत हक्क बजावत मुंबईकरांना मतदान करण्याचे आव्हान केले.

बॉलिवूडमध्ये अण्णा नावाने परिचित असलेल्या सुनिल शेट्टीने आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला गराडा घातला होता. त्याच्या बरोबर अनेकांनी सेल्फे ही घेतली. सुनिल शेट्टी प्रमाणे जॉन इब्राहीम याने ही मतदान केले. यावेळी तो मतदानासाठी आपल्या आई वडीलांनाही घेवून आला होता. त्याच बरोबर अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी ही आपल्या मतदानाच हक्क बजावला. जुहू इथल्या मतदान केंद्रावर अक्षय कुमार आला होता. त्याने मतदान केल्यानंतर एका तरुणीने त्याच्या पाया पडले. त्यावेळी त्याने तिला रोखले. शिवाय सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. अक्षय सोबत ट्विकल खन्नाने ही मतदान केले. 

नक्की वाचा - BMC Election 2026 LIVE: बापरे! अकोल्यात मतदान केंद्रावरच मतदाराचा मृत्यू, निधनाचं कारण ऐकून बसेल धक्का

Advertisement

दक्षिणाच्या अभिनेत्री आणि आता बॉलिवूडमध्ये ही आपली छाप पाडणारी तमन्ना भाटीया ही मतदानासाठी आली होती. त्यावेळी तिच्या सोबत तिचे आई वडील ही दिसले. तिने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेही मतदान केले. शिवाय सोनाली बेंद्रे, मिलींद गुणाजी, सुबोध भावे यांनी ही मतदान करत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. इशा कोपीकर, सलीम खान, गायक कैलाश खेर यांनी ही मतदान केले. मुंबईकरांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे. त्यांनी घराबाहेर पडावे. मोठ्या प्रमाणात मतदान करावे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे. तुम्ही  ही तुमची जबाबदारी ओळखा असे आवाहन या वेळी या सेलिब्रेटींनी केले आहे. 

नक्की वाचा - Raj Thackeray: 'पाडू'नंतर मतदानाच्या शाईबाबत राज ठाकरेंचा मोठा आरोप, म्हणाले...

Advertisement

अनुप जलोटा हे ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नितिन गडकरी, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही मतदान केले. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. सेलिब्रेटी बडे नेते यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व सामान्य ही मतदानासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. 

आता पर्यंत मतदान केलेले सेलिब्रेटी 

  • हेमा मालिनी 
  • सचिन तेंडुलकर 
  • अंजली तेंडुलकर 
  • अमिर खान 
  • सुनिल शेट्टी
  • जॉन इब्राहीम
  • तमन्ना भाटीया 
  • सोनाली बेंद्रे
  • मिलिंद गुणाजी 
  • अक्षय कुमार
  • ट्वींकल खन्ना
  • सुबोध भावे
  • इशा कोपीकर    
  • कैलाश खेर 
  • अनुप जलोटा 
  • शिल्पा शेट्टी 
  • गुलजार 
  • परेश रावल 
  • नाना पाटेकर 
  • किरण राव 
  • सुमित राघवन 
  • चिन्मयी सुमित
  • राकेश रोशन 

  

Advertisement