Maharashtra Civic Body Polls 2026 Live Updates: राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांसाठी एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलीय. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 हजार 908 उमेदवार आहेत. मतदान सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत करता येईल.
BMC Election 2026 LIVE: जिजामाता शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान मशीन बंद
जालन्यात मतदान मशीन बंद पडल्याने प्रभाग क्रमांक 10 मधील मतदानाला 15 मिनिट उशीराने सुरुवात
BMC Election 2026 LIVE:
डोंबिवली: भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं
BMC Election 2026 LIVE: कडेकोट पोलीस बंदोबस्त
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी 83 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात
BMC Election 2026 LIVE:
परभणी : परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदानाला सुरुवात
सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात
16 प्रभागातील 65 जागांसाठी होतंय मतदान
149 इमारतीमध्ये 341 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत
मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अधिकाऱ्यांसह 2000 पोलिसांचा बंदोबस्त निवडणुकीसाठी तैनात
BMC Election 2026 LIVE: उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर भडकले
छत्रपती संभाजीनगर : माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू तथा उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर भडकल्याचे पाहायला मिळालं.
आमच्या लोकांना मंडप लावू दिला जात नाही. मात्र भाजपच्या लोकांना मंडप लावू दिला जातोय, मागील निवडणुकी वेळेसही मंडप हटवला होता.मात्र भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचा मंडप ठेवला जातो:उमेदवार राजेंद्र दानवे
BMC Election 2026 LIVE: ईव्हीएममध्ये बिघाड
छत्रपती संभाजीनगर : प्रभाग क्रमांक 3 येथे EVMमध्ये बिघाड झाल्याची माहिती
BMC Election 2026 LIVE:
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका, मतदान प्रक्रियेला सुरुवात
BMC Election 2026 LIVE: पुण्यात कडेकोट बंदोबस्त
पुणे : तब्बल 4 हजार 11 मतदान केंद्रांवर आज 35 लाखांहून अधिक पुणेकर करणार मतदान
थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात
3 हजार 500 हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पोलिसांकडून EVM मशीन देखील आली तपासण्यात
BMC Election 2026 LIVE:
- जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
- जालन्यात 291मतदान केंद्रावर सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.
- महानगरपालिका निवडणुकीत जालन्यात 2 लाख 45 हजार 929 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
- 65 नगरसेवक पदासाठी एकूण 454 उमेदवार रिंगणात आहेत.
BMC Election 2026 LIVE: पुणे: टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावरील तयारी
#WATCH | Pune, Maharashtra: Preparations and mock poll underway at a polling booth in New English School on Tilak Road.
— ANI (@ANI) January 15, 2026
Voting will begin from 7.30 am in 29 different Municipal Corporations across Maharashtra today. pic.twitter.com/1Hnk4wrhRS
BMC Election 2026 LIVE:
नागपूर :महानगरपालिका निवडणुकीसाठी नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी सजावट करण्यात आली.

BMC Election 2026 LIVE: पुण्यात चौरंगी लढत
पुणे: तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान
- पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून
- पुण्यात चौरंगी लढत
- भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणात
- एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
- पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
- पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
- महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
- शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
- इतर मतदार: 488
- बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2
BMC Election 2026 LIVE: ठाण्यात सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात
- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
- ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट माध्यमातून मतदान होणार आहे.
- मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात.
BMC Election Voting 2026 aqua line to help mumbaikars on 15 January Metro Line 3 Will Run till Midnight
मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो प्रशासनाने आरे - कफ परेड रोड भुयारी मेट्रो 3 सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
BMC Election 2026 LIVE
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीस संबंधीत ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.
BMC Election 2026: Public Holiday Declared on January 15; Banks, Private Offices, and Schools to Remain Closed for Voting
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याबाबत सरकारनं एक महत्त्वाचा आदेश जारी केलाय.
BMC Elections 2026: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पोस्टने वेधले लक्ष
या वेळी फक्त ठाकरेच ! pic.twitter.com/NNxYcRNX6g
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 15, 2026
BMC Elections 2026: मतमोजणी कधी होणार?
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीस संबंधीत ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरवात होईल.
BMC Elections 2026: पोलीस बंदोबस्त
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 3 अपर पोलीस अधीक्षक, 63 पोलीस उप अधीक्षक, 56 पोलीस निरीक्षक, 858 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि 11 हजार 938 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण 42 हजार 703 होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण 57 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
BMC Elections 2026: किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग असून यांसह सर्व महानगरपालिका मिळून 893 प्रभाग आहेत. त्यात एकूण 2 हजार 869 जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 15 हजार 908 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
BMC Elections 2026
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत.
BMC Elections 2026: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVN) व्यवस्था करण्यात आलीय. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केलीय.
KDMC Election 2026: How to Find Your Name in Voter List Online? Scan QR Code and Get Polling Booth Details Instantly
KDMC voter list: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.
BMC Elections 2026
एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिला; तर 4 हजार 596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांपैकी एकूण 3 हजार 196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.
BMC Elections 2026
मतदान सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Maharashtra Civic Body Polls 2026 LIVE
बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
Mumbai BMC Election LIVE Updates
निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आलीय.
BMC Election 2026 Live News Updates
एकूण 2 हजार 869 जागांसाठी महानगरपालिकेच्या निवडणूक होत आहेत, एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांसाठी एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.