Dry day in Maharashtra : महाराष्ट्रात सलग 3 दिवस ड्राय डे; कधीपासून मद्यविक्री बंद होणार?

राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. याशिवाय १६ जानेवारीला मतमोजणी आहे. या काळात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

3 Days Dry day in Maharashtra : महानगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. याशिवाय १६ जानेवारीला मतमोजणी आहे. या काळात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. 

किती दिवस मद्यविक्री बंद राहणार?

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजे १४ जानेवारी, मतदानाचा दिवस १५ जानेवारी आणि मतमोजणीचा दिवस १६ जानेवारी रोजी ड्राय डे असेल. म्हणजे १४ ते १६ जानेवारी यादरम्यान राज्यभरातील मद्यविक्रीची दुकानं, बार, परमिट रुम बंद राहतील. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यात बंदी आहे. मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होईल आणि १६ जानेवारीला मतमोजणी होईल. 

नक्की वाचा - Pune News: 'लाडक्या बहि‍णींना 14 तारखेला 3 हजार मिळणार!', पुण्यात मेसेज व्हायरल; निवडणूक आयोगाने काय म्हटलं?

यंदाची निवडणूक चुरशीची असणार आहे. महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे भाजप मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. आज १३ जानेवारीला सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. यादरम्यान अनुचित घडू नये, मतदारांना आमिष दाखविण्यासाठी याचा वापर केला जाऊ नये यासाठी  १४ ते १६ जानेवारी हे तीन दिवस राज्यातील दारुची दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे. 

Advertisement