'मला पाडण्याचा स्वकीयांनीच प्रयत्न केला' कोकणात निकालानंतर शिमगा

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. विजयी झालेले विजयाचा आनंद लुटत आहेत. तर पराभूत झालेले उमेदवार आत्मपरिक्षण करत आहेत. पण कोकणात थोडी वेगळी स्थिती आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे हे विजयी झाले आहे. पण आपल्याला या निवडणुकीत स्वकीयांनीच पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना त्याचा प्रत्यय आणून देणार असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.    

हेही वाचा - तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर 

नारायण राणे यांनी विजयानंतरही काही आप्तांनी आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप केला आहे. विजयानंतर बोलत असताना ते म्हणाले की काही आप्त, काही सहकारी, महायुतीमधील काही मित्र यांचे काम 'नांदा सौख्य भरे'ला शोभणारे नव्हते. ज्यांनी हा दगाफटका देण्याचा प्रयत्न केला त्यांची माहिती आपल्याकडे आहे असेही राणे म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेळ आल्यावर त्याचा हिशोब चुकता केला जाईल असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.  

Advertisement

हेही वाचा - हनुमानाचा धावा केला तरीही...; अमरावतीत नवनीत राणाच्या पराभवाची महत्त्वाची 6 कारणं

नारायण राणे यांच्या विजयात महत्वाचा हात होता तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. या जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातून राणे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यात सावंतवाडीतून 31 हजार, कणकवली 41 हजार आणि कुडाळ 26 हजाराचे मताधिक्य मिळाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील तिनही मतदा संघात राणे हे पिछाडीवर होते. त्यात राजापूरमध्ये 21 हजाराने, रत्नागिरीत 10 हजाराने तर चिपळूणमध्ये 19 हजाराने पिछाडीवर होते. तर सिंधुदुर्गने साथ दिली नसती तर नारायण राणे यांचा विजय अवघड झाला असता. हे मताधिक्य पाहात कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही याची  चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा इशारा नक्की कोणाला होता याबाबतही आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.  

Advertisement

Advertisement