देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या लोकसभा निकाल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सायंकाळी 4 वाजेपर्यंत आलेल्या निकालांनुसार भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना नागरिकांनी थेट घरचा रस्ता दाखवला. तर मविआतील अनपेक्षित उमेदवारांना डोक्यावर बसवलं. दरम्यान राज्यातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपला धक्का देणारा निकाल समोर आला आहे.
येथील नवनीव राणा पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. येथून त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना तब्बल 3,59,492 लाखांचं लीड मिळालं आहे. तर नवनीत राणा या 17,804 मतांनी पिछाडीवर असून पराभवाच्या छायेत आहेत. येथून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. दरम्यान त्यांच्या या पराभवामागे काय कारणं ठरली याचा घेतलेला आढावा.
1 नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे राज्यभरात कायम चर्चेत राहिले आहेत. कधी हनुमान चालिसा, तर कधी मोदींविरोधातील वक्तव्य तर अनेकदा विरोधकांवर केलेल्या खालच्या पातळीवरील कमेंटमुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पातळीवरून टीका केली जात होती.
2 अमरावतीत शेतकरी आत्महत्या, कापूस उत्पादकांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, कंत्राटीकरण, मेळघाटातील कुपोषण यांसारखे अनेक गंभीर प्रश्न समोर आहेत. प्रत्यक्षात हे मुद्दे निवडणुकीत चर्चिले गेले नाही. तर भाजपकडून हिंदुत्वच्या मुद्द्यावर प्रचार करण्यात आला.
नक्की वाचा - आतापर्यंत आघाडीवर असलेल्या सुजय विखे पाटलांना धक्का
3 दुसरीकडे बळवंत वानखडे यांनी जिंकून आल्यानंतर काय काय करणार याची एक यादीच जाहीर केली. मात्र मूळ प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काम केलं होतं. नसल्याचा आरोप अमरावतीकरांकडून केला जात . देवापेक्षा माणसांवर खर्च करायला हवा. देवपूजा घरी करतो ते सार्वजनिक पातळीवर दाखवण्याची गरज नाही, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
4 मोदींची जादू चालली नाही...
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपसह काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरावतीत आले होते. याशिवाय देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांचाही अमरावतीत दौरा झाला. दुसरीकडे बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत दाखल झाले होते.
5 भाजपतंर्गत विरोध ठरला मारक
नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यावरुन भाजपच्या नेत्यांमध्येही असंतोष होता. याशिवाय एकनाथ शिंदेंचा हात धरून गुवाहाटीला जाणारे आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंनी महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात शड्डू ठोकत प्रहार जनशक्तीचा उमेदवार रिंगणात उतरवला.
6 2019 मध्ये मोदींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा यांनी आपली भूमिका बदलली आणि मोदींचा गवगवा सुरू केला. परिणामी नवनीत राणा यांच्याविरोधात वातावरण गेले. त्यामुळे भाजपमधील नेतेसुद्धा नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होते. राणा दाम्पत्यांच्या राजकीय खेळीमुळे नैतिकतेचा मुद्दाही उपस्थित केला जात होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world