राजेंना उमेदवारी, राणे वेटिंगवर, कट्टर विरोधकाने राणेंना डिवचले

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

महायुतीत साताऱ्या बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबाबत निर्णय होत नव्हता. मात्र साताऱ्याबाबतचा सस्पेन्स  संपला आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. यावरून त्यांच्या कट्टर विरोधकाने राणेंना डिवचले आहे. शिवाय महायुतीतले दुसरे इच्छुक किरण सामंत यांनाही खोचक सल्ला दिला आहे. वैभव नाईक हे विनायक राऊत यांचा उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी राणेंवर टिका करताना सामंतावरही हल्लाबोल केला. 

'राणेंना उमेदवारी मिळू नये म्हणून...' 
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अजून निश्चित नाही. इथे भाजपकडून नारायण राणे आणि शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत. त्यामुळे इथे उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमिवर राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं आहे.  राणेंना उमेदवार मिळू नये किंवा ती जाहीर होऊ नये या मागे अदृष्य शक्तींचा हात आहे. हे हात नागपूरात आहेत की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यामुळेच त्यांची उमेदवारी जाहीर होत नाही, असं नाईक म्हणाले. या मतदार संघात महायुतीचे दोघे जण इच्छुक आहेत. दोघेही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दोघा पैकी कोणीही उभे राहीले तरी ते पडणार हे निश्चित आहे असंही वैभव नाईक म्हणाले.

Advertisement

हेही वाचा - साताऱ्यात राजेच! भाजपाकडून अखेर शिक्कामोर्तब

किरण सामंत यांना मैत्रीचा सल्ला 
यावेळी वैभव नाईक यांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनाही मैत्रीचा सल्ला दिला आहे. किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे निवडणुकीचे अर्ज आहेत. हे टेंडरचे अर्ज नाहीत. हे कुठेही पाठी घेता येत नाहीत, ते मॅनेज होत नाहीत असा टोला त्यांना सामंत यांना लगावला. शिवाय जो अर्ज घेतला आहे तो त्यांनी भरावा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.    

Advertisement

हेही वाचा - 'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर

विनायक राऊत यांचा अर्ज 
शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यानिमित्ताने वैभव नाईक रत्नागिरीत दाखल झाले होते. राऊत यांचा एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होईल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या वेळी भाजप आमच्या बरोबर होते. आता आम्ही त्यांच्यापासून काडीमोड घेतला आहे. मतदार संघात गेल्या 10 वर्षात राऊतांचा संपर्क चांगला आहे. मोदींची आश्वासन खोटी ठरली आहेत. त्यामुळे लोकांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे नाईक म्हणाले.  निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशी ही लढाई असल्याचे ते म्हणाले.    

Advertisement

हेही वाचा - दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?