जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर

'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर
अमरावती:

भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा या नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या विधानामुळे. आता त्या त्यांच्या आणखी एका विधानाने  चर्चेत आल्या आहेत.  पण त्यामुळे भाजपची मात्र कोंडी झाली आहे. प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींबद्दलच वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्यांच्या यावक्तव्याचा विरोधक आता चांगलाच उपयोग करून घेतील हे निश्चित आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्याही अडचणी वाढू शकतात. 

नवनीत राणा काय म्हणाल्या? 
नवनीत राणा या अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. सध्या त्या प्रचारात व्यस्थ आहेत. भाजपचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून मतं मागत आहेत. पण राणा याचे मत काहीसे वेगळे आहे. प्रचार सभेत बोलताना त्यांनी असे काही मत व्यक्त केले ज्यामुळे भाजपच्या सर्वच नेत्यांनी भूवया उंचावल्या. ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायची प्रमाणे लढायची आहे. मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका, एक लक्षात ठेवा, येवढी मोठी यंत्रणात असताना 2019 मध्ये या मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार जिंकली होती. त्यामुळे मोदींची हवा आहे, आपण सहज निवडून येऊ, या भ्रमात कोणीही राहू नका असा पुन्हा एकदा उच्चार राणा यांनी जाहीर सभेत केला. 

हेही वाचा - काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं

अमरावतीमध्ये राणांपुढे आव्हान 
अमरावती लोकसभेतून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध केला होता. त्या भाजपचे स्थानिक नेतेही होते. शिवाय महायुतीतील बच्चू कडूनीही राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्याच बरोबर काँग्रेसने बळवंत वानखेडेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणांसाठी ही निवडणूक तेवढी सोपी राहीलेली नाही. त्यांना विरोधकांबरोबरच स्वकीयां बरोबरही लढावं लागणार आहे. त्यात त्यांनी मोदींबाबतचे केलेल्या वक्तव्यामुळे मुळचे भाजपचे नेते नाराज झाले आहे. त्याचाही त्यांना फटका बसेल असे बोलले जात आहे.

हेही वाचा -  आघाडीत बिघाडी होणार? सांगलीत पेच, विशाल पाटीलांचं ठरलं!

नवनीत राणा नेहमीच चर्चेत 
नवनीत राणा या त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मग त्याचे ते उद्धव ठाकरें बाबत केलेले वक्तव्य असोकी मातोश्री समोर जावून हनुमान चालीसा बोलण्याची घोषणा असो. राणा या नेहमीच चर्चेत असतात. मेळघाटात आदीवासी महिलांना साड्या वाटपानंतरही त्यांची चर्चा झाली होती. मात्र आता थेट त्या मोदींबद्दलच बोलल्या आहेत. शिवाय त्या भाजपच्या उमेदवारही आहेत. त्यांच्या यावक्तव्याचा वापर विरोधक करून घेण्यास मागे पुढे पाहाणार नाही. त्यामुळे नवनीत राणा यांना सांभाळून बोलण्याच्या सुचना करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे यावक्तव्यावर त्या आता काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागेल.      

हेही वाचा - 'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com