नाशिकमध्ये मविआत ट्वीस्ट, काँग्रेस-सेनेत 'या' जागेवरून रस्सीखेच

नाशिक मध्य हा नाशिक शहरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. याच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत सध्या जोरदार रस्सीखेच बघायला मिळते आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अजूनही पुर्ण झालेली नाही. काही जागांवर चर्चेचं घोडं अडलं आहे. त्या पैकीच एक जागा आहे ती म्हणजे नाशिक मध्य विधानसभेची. या मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटा बरोबरच काँग्रेसनेही दावा केला आहे. शहरात काँग्रेसला ही एकमेव जागा मिळावी असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे. काँग्रेसच्या हेमलता पाटील या या मतदार संघातून इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत गीते हे इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात कामालाही सुरूवात केली आहे. त्यांना मातोश्रीवरून तसे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक मध्य हा नाशिक शहरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. याच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत सध्या जोरदार रस्सीखेच बघायला मिळते आहे. एकीकडे ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना मातोश्री वरून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे ही जागा काँग्रेसची असून उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा मिळणार नाही. पक्षश्रेष्ठीनी आम्हाला तसे आश्वासन दिल्याचं त्यांनी NDTV मराठीशी बोलतांना स्पष्ट केलंय. 

ट्रेंडिंग बातमी - जरांगेंनी पत्ते खोलले, हिशोब होणार! 'तू देत नाही तर तुला पाडल्या शिवाय सोडत नाही'

नाशिक मध्य मधून आपण इच्छुक असल्याचे हेमलता पाटील यांनी सांगितलं. या मतदार संघात मविआची उमेदवार मीच असेन असं ही त्या म्हणाल्या आहेत. ही जागा काँग्रेसला मिळणार. शिवाय काँग्रेसचाच उमेदवार या मतदार संघातून विजयी होणार असंही त्या म्हणाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गीते हे इथून इच्छुक आहेत. पण ते जर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे असं त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?

पण आपण सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत. पक्षा बरोबर एकनिष्ठ राहीलोत. त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय आमच्याकडे उमेदवार चांगला असेल तर दुसऱ्या कोणाला पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा विचार होईल असे वाटत नाही. त्याच बरोबर शिवसेनेला ही जागा सुटेल असंही वाटत नाही. काँग्रेसने फक्त नाशिक मध्यवर दावा केला आहे. ही जागा काँग्रेसला मिळेल असं आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.