राज्यातील महानगरपालिकांच्या निकालाच्या तोंडावर नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यात यश आलं आहे. नाशिकच्या १२२ जागांपैकी भाजप ६६ जागा आघाडीवर आहे. भाजपने एकहाती बहुमताचा ६२ हा जादुई आकडा पार केला आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे शिंदेंची शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे.
नाशिकमध्ये कोण कोण जिंकलं?
- नाशिकच्या प्रभाग 1 मध्ये भाजपचे 3 तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी
- मंत्री गिरीश महाजनांचे दोन्ही निकटवर्तीय दिपाली गिते आणि रुपाली नन्नावरे विजयी
- भाजपचे रंजना भानसी विजयी
- ड्रग्सच्या आरोपावरून गाजलेल्या प्रभाग 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रविण तिदमे विजयी
- भाजपच्या पल्लवी गणोरे विजयी
- शिंदे शिवसेनेच्या डॉ. पूनम महाले विजयी
- भाजपचे राजेंद्र महाले विजयी
- मुस्लिम बहुल प्रभाग 14 मध्ये ३ काँग्रेस तर एक अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
- काँग्रेसचे नाझीया अत्तार, सामीया खान, सुफी जीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे जागृती गांगुर्डे विजयी
- भाजपच्या चित्रा तांदळे विजयी
-आमदार खोसकर यांनी निवडणूक केली होती प्रतिष्ठेची
प्रभाग 4
विजयी उमेदवार..
मोनिका हिरे- भाजप
सरिता सोनवणे -भाजप
सागर लामखेडे- भाजप
हेमंत शेट्टी -भाजप
प्रभाग 5
विजयी उमेदवार...
कमलेश बोडके -शिवसेना
चंद्रकला धुमाळ-भाजप
नीलम पाटील-भाजप
गुर्मीत बग्गा-भाजप
प्रभाग 6
विजयी उमेदवार..
प्रमोद पालवे -शिवसेना शिंदे
वाळू काकड -भाजप
चित्रा तांदळे -भाजप
रोहिणी पिंगळे -भाजप
नाशिक महानगरपालिका
एकूण जागा - १२२
भाजप विजयी - ६६
शिंदेंची शिवसेना विजयी - २१
ठाकरेंची शिवसेना - ०८
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - ०३
काँग्रेस - ०३
मनसे - ०१
अपक्ष - ०१
आघाडीवर
भाजप - १२
शिंदेंची शिवसेना - ०६
ठाकरेंची शिवसेना - ०१