NDA च्या संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरूवात, 9 जून रोजी नरेंद्र मोदींचा शपथविधी

सध्या एनडीएची संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून यावेळी घटकपक्षातील सर्व पक्ष उपस्थित आहेत.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. सध्या एनडीएची संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून यावेळी घटकपक्षातील सर्व पक्ष उपस्थित आहेत. यावेळी महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. 

नरेंद्र मोदी एनडीएच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पोहोचले असून यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीश कुमारही उपस्थित आहेत. एनडीएची ही बैठक जुन्या संसदीय भवनात पार पडत आहे.  या बैठकीनंतर मोदी सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. 
 

बातमी अपडेट होत आहे.