'पैसे घेऊन मतदान न करणे गुन्हा नाही' माजी आमदाराचा अजब सल्ला

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी मतांसाठी लक्ष्मी दर्शन घडवलं जातं अशी चर्चा आहे. त्यात एका माजी आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी आली घरा तर, परत कशाला करा?' पुन्हा अशी संधी येणे नाही. असं वक्तव्य माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. मात्र त्या पुढे त्यांनी केलेल्या वक्तव्या वरूनही सर्वच जण आवाक झाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा  

काय म्हणाले अनिल गोटे? 

मतांसाठी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी दर्शनावर गोटे थेट बोलले आहे. ते पुढे म्हणतात, 'लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर कुणीही आपल्या कष्टाचे पैसे वाटत नाही. उधळतही नाही. पब्लीक का पैसा पब्लीक मे, असं सांगताना पैसे घेवून मतदान करणे हा गुन्हा आहे. पण पैसे घेवून मतदान न करणे हा गुन्हा नाही असेही ते थेट बोलतात. त्यामुळे पैसे घ्या पण मतदान करू नका असा काहीसा सल्ला देण्याचा तर गोटे प्रयत्न करत नाहीत ना अशी चर्चा सध्या धुळ्यात सुरू आहे. 

हेही वाचा -  उमेदवारांची श्रीमंती! जळगाव - रावेर मतदारसंघात कोण सर्वात श्रीमंत


राजकारण्यांवर केला हल्लाबोल 

गोटेंनी यावेळी राजकीय पुढाऱ्यांवरही टिका केलीय. कोणताही नेता हा मतदारांच्या कल्याणासाठी काम करत नाही. त्याला त्याची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या पुढच्या पिढ्यांची चिंता असते. शिवाय त्याच्या बरोबरच्या दोन चार चमच्यासाठी तो काही तरी करत असतो. अच्छे दिन आयेंगे म्हणजे त्यांचे अच्छे दिन असा त्याचा अर्थ होतो. ते तुमच्या कोणच्याही प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यांना त्याचे काहीही पडलेले नाही. नेते हे स्वार्थी आहेत. ते त्यांचे पोट भरण्यालाच प्राधान्य देतात. 

'पाच दिले तर दहा मागा' 

निवडणुकीत सर्रास पैशाचे पाटप होईल. नेत्याच्या घरातून आलेल्या प्रत्येक पैशावर तुमचा अधिकार आहे असेही मतदारांना गोटे सांगत आहेत. तुम्ही दिलेल्या मतामुळेच ते सत्तापदापर्यंत पोहचले. त्यातूनच त्यांनी अमाप पैसे कमावले. प्रत्येक मतदार संघात मतांचे रेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे आताच अडव्हान्स बुकींग करा. पाच देत असतील तर दहा मागा, दहा देत असतील तर पंधरा मागा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यात आपण काही चुकेचे करत आहोत अशी भावना मनात बाळगू नका. मी तुमच्या बरोबर आहे असं सांगायलाही गोटे विसरत नाहीत. मतदारांना आवाहन करणारे, आणि सल्ला देणारे अनिल गोटे यांचे हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

Advertisement