Phalodi Satta Bazar: सट्टा बाजारात कुणाची हवा? फलोदी सट्टा बाजार सर्वांचे अंदाज चुकवणार?

फलोदी सट्टा बाजारातील हे आकडे सध्याच्या मतदानाच्या कलानुसार असले तरी, प्रत्यक्ष निकाल काय लागतो हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

Phalodi Satta Bazar: पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रीया पार पडली आहे. त्यानंतर एक्झिट पोल ही समोर आले आहेत. प्रत्येक संस्थेने वेगवेगळे अंदाज व्यक्त केला आहेत. त्यामुळे कोणत्या राज्यात कुणाची सत्ता हे अजून ही ठोस पणे सांगता येत नाही. त्यात सट्टा बाजारात काय सुरू आहे याचे दर ही समोर आले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील विक्रमी मतदानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एक्झिट पोलसोबतच आता सर्वांचे लक्ष फलोदी सट्टा बाजाराकडे लागले आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या ताज्या आकडेवारीनुसार धक्कादायक चित्र समोर आले आहे. 

फलोदी सट्टा बाजाराच्या आकड्यांनुसार बंगालमध्ये भाजप मुसंडी मारण्याची शक्यता आहे. त्यांना स्पष्ट बहुमताचा आकडा पार करताना दाखवण्यात आले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला सट्टा बाजारात तृणमूल काँग्रेसला (TMC) आघाडी मिळताना दिसत होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर गणिते बदलली आहेत. नव्या अंदाजानुसार भाजपला 150 ते 152 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला 137 ते 140 जागांवर समाधान मानावे लागू शकते. विशेष म्हणजे, भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांची स्थितीही यंदा काहीशी नाजूक असल्याचे सट्टा बाजाराचे भाव सांगत आहेत.

Advertisement

नक्की वाचा - EXIT POLL 2026: दक्षिणेची कुणाला साथ? तामिळनाडूत कोणाची जादू? केरळममध्ये काँग्रेस की डावे?

फलोदी सट्टा बाजाराने केवळ बंगालच नव्हे तर आसाम, तमिळनाडू आणि केरळबाबतही अंदाज वर्तवले आहेत. आसाममध्ये भाजप युतीला 98 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये 'इंडिया' आघाडीला 140 जागांसह सत्ता मिळताना दिसत आहे. तर केरळमध्ये 80 जागांसह काँग्रेस प्रणित UDF आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तामिळनाडूत स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होवू शकतात. तर केरळमध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशी स्थिती आहे. आसाममध्ये भाजप सत्ता राखताना दिसत आहे. 

नक्की वाचा - Exit Poll 2026: बंगालमध्ये दीदींचा गड कोसळणार की भाजपाचं कमळ फुलणार? पाहा सर्व एक्झिट पोलची आकडेवारी

बंगालच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना फलोदी सट्टा बाजाराने मोठा दावा केला आहे. या बाजाराच्या अंदाजानुसार, बंगालमध्ये यंदा कमळ फुलण्याची दाट शक्यता आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, तमिळनाडूमध्ये 'इंडिया' आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.  केरळमध्ये एलडीएफला मागे टाकत यूडीएफ 80 जागांपर्यंत मजल मारू शकते. या आकड्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फलोदी सट्टा बाजारातील हे आकडे सध्याच्या मतदानाच्या कलानुसार असले तरी, प्रत्यक्ष निकाल काय लागतो हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल.