West Bengal Exit Poll 2026: भारतातील सर्वात चुरशीची आणि हायव्होल्टेज मानली जाणारी पश्चिम बंगाल विधानसभेची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच सर्वांचं लक्ष एक्झिट पोलच्या आकड्यांकडे लागलं होतं. ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला शाबूत राहणार की भाजपाने बंगालमध्ये प्रथमच सत्तेची कवाडे उघडण्यात यश मिळणार? याचा प्राथमिक अंदाज या आकड्यांमधून समोर येत आहे. बहुतांश एक्झिट पोलनी बंगालमध्ये सत्तांतराचे संकेत दिले असून भाजपा विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.
बहुमताचा आकडा आणि एक्झिट पोलचे गणित
पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला बहुमताचा म्हणजेच 148 जागांचा आकडा पार करावा लागणार आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. मात्र, चारपैकी तीन प्रमुख संस्थांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दाखवले आहे.
पी-मार्क (P-Marq) या संस्थेच्या अंदाजानुसार, भाजपला 150 ते 175 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर तृणमूल काँग्रेसला 118 ते 138 जागांवर समाधान मानावं लागू शकतं.
वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगतात?
राज्यातील सत्तेचा कल जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी आपले आकडे जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे.
मॅट्रिझ (MATRIZE)
भाजप (BJP): 146 - 161
तृणमूल काँग्रेस (TMC): 125 - 140
काँग्रेस (CONG): 0
डावे (LEFT): 0
इतर (OTH): 6 - 10
( नक्की वाचा : EXIT POLL 2026: दक्षिणेची कुणाला साथ? तामिळनाडूत कोणाची जादू? केरळममध्ये काँग्रेस की डावे? )
प्रबोधन रिसर्च ग्रुप (Prabodhan Research Group)
भाजप (BJP): 183
तृणमूल काँग्रेस (TMC): 103
काँग्रेस (CONG): 4
डावे (LEFT): 0
इतर (OTH): 4
पिपल्स पल्स (Peoples Pulse)
या संस्थेचा अंदाज इतर संस्थांच्या तुलनेत वेगळा असून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पुन्हा सत्तेत येताना दाखवले आहे.
तृणमूल काँग्रेस (TMC+): 177 - 187
भाजप (BJP+): 95 - 110
काँग्रेस (CONG+): 1 - 3
डावे (LEFT+): 0 - 1
( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )
जनमत पोल्स (Janmat Polls)
या संस्थेच्या आकड्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी गुड न्यूज दिलीय. या पोलनं तृणमूल काँग्रेसला मोठ्या बहुमताचा अंदाज वर्तवला आहे.
तृणमूल काँग्रेस (TMC): 195 - 205
भाजप (BJP): 80 - 90
काँग्रेस (CONG): 1 - 3
डावे (LEFT): 0 - 1
काँग्रेस आणि डाव्यांचा सुपडा साफ?
या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या आघाडीला मोठी गळती लागल्याचे चित्र आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये त्यांना शून्यावर किंवा केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळताना दाखवण्यात आले आहे. बंगालमध्ये आता केवळ तृणमूल आणि भाजप अशीच थेट लढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. एनडीटीव्ही-ॲक्सिस माय इंडिया (NDTV-Axis My India) चे आकडे उद्या गुरुवारी प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world