'काँग्रेसची लूट जिंदगी के बाद भी...' Inheritance Tax च्या मुद्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल

PM Modi : काँग्रेस वारसा कर लावणार आहे. याचा अर्थ तुम्हाला वडिलोपार्जित मिळाणाऱ्या संपत्तीवरही कर लावला जाईल, असा आरोप पंतप्रधानांनी केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंतप्रधान मोदींनी 'वारसा करा'च्या मुद्यावर काँग्रेसवर टीका केली आहे. (फाईल फोटो)
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi)  यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या अमेरिकामधील 'वारसा टॅक्स' वक्तव्यावर हल्लाबोल केलाय. 'काँग्रेसचा धोकादायक संकल्प पुन्हा एकदा उघड झालाय. शाही परिवारमधील राजपूत्रांच्या सल्लागारानं काही वेळापूर्वी मिडल क्लास वर जास्त टॅक्स लावावा असं सांगितलं होतं. आता हे त्याच्याही एक पाऊल पुढं गेले आहेत,' अशी टीका मोदी यांनी केलीय. 

छत्तीसगडमधील सरगुजामध्ये पंतप्रधानांची प्रचारसभा झाली. त्यामध्ये बोलताना मोदी म्हणाले की,

'काँग्रेस वारसा कर लावणार आहे. याचा अर्थ तुम्हाला वडिलोपार्जित मिळाणाऱ्या संपत्तीवरही कर लावला जाईल. तुम्ही कष्टानं मिळावलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही. काँग्रेस सरकारचा पंजा ती हिसकावून घेईल.' 

पंतप्रधान मोदी पुढं म्हणाले, 'काँग्रेसचा मंत्र आहे, 'काँग्रेसची लूट जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी. तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला अतिरिक्त कर लादून मारेल, आणि तुम्ही गेल्यानंतर तुमच्यावर Inheritance Tax चा बोजा लादेल. ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष वडिलोपार्जित संपत्ती समजून मुलांना दिली त्यांना सामान्य भारतीयांनी त्यांची संपत्ती मुलांना द्यावी हे मान्य नाही. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेता सॅम पित्रोदा यांनी सांगितलं की, 'अमेरिकेमध्ये वारसा टॅक्स लागतो. त्यानुसार एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या संपत्तीचा काही भाग नातेवाईकांना दिला जातो. तर मोठा हिस्सा सरकार स्वत:कडं ठेवते.'

( नक्की वाचा : इराणी वि. वाड्रा? : 'रॉबर्ट वाड्रा अबकी बार...' अमेठीतील रस्त्यांवर लागले पोस्टर )
 

काँग्रेसनं हात झटकले

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनं हात झटकले आहेत. या वक्तव्याशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. यापूर्वी, सॅम पित्रोदा यांनी हा खास कायदा असल्याचं सांगितलं होतं.  या कायद्यात तरतूद आहे त्यानुसार तुम्ही आयुष्यभर जी भरपूर संपत्ती मिळवलीय त्यामधील काही भाग मृत्यूनंतर नागरिकांसाठी सोडायला हवा. तुम्ही संपत्तीचा संपूर्ण भाग सोडावा असा याचा अर्थ नाही. पण, काही हिस्सा नक्की सोडला पाहिजे. मला हा कायदा योग्य वाटतो. भारतामध्ये असा कोणताही कायदा नाही. 

Advertisement
Topics mentioned in this article