लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा

सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 58 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 57 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे. तर कश्मिरच्या एका जागेवरही मतदान होत आहे.  या आधी लोकसभेची पाच टप्पे पार पडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सहाव्या टप्प्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते दिल्लीकडे. दिल्लीच्या सातही जागांवर काँग्रेस आप आघाडी आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक हाती प्रचार केला. जामीन मिळाल्यानंतर भाजप विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे दिल्लीत किती मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शिवाय उत्तर प्रदेशच्या 14, हरियाणा 10, पश्चिम बंगाल 8, बिहार 8, झारखंड 4, ओडिशा 6 जागांचा समावेश आहे. 

लोकसभेच्या या सहाव्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात दिल्लीत बासूरी स्वराज, कन्हैय्या कुमार, मनोज तिवारी, राज बब्बर यांचा समावेश आहे. यानंतर शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे.  शेवटच्या टप्प्यात 8 राज्यात 57 जागांसाठी मतदान होईल. त्यानंतर 4 जूनला मतमोजणी होणार आहे.   

Advertisement