- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत संजय गायखे यांनी शेतकऱ्याच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल केला
- त्यांनी उमेदवारी अर्जासह पाच हजार रुपयांची चिल्लर अनामत रक्कम म्हणून जमा केली
- संजय गायखे हे बच्चू कडूं यांच्या प्रहार संघटनेतून प्रभाग क्रमांक २२ क मधून निवडणूक लढवत आहेत
सूरज कसबे
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली होती. काहींना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळाली नाही. तर काहींच्या पदरात शेवटी शेवटी उमेदवारी मिळाली. त्यामुळे सगळीकडेच गोंधळाचे वातावरण होते. पण त्यात ही एक उमेदवार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याची वेशभूषा आणि त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी आणलेली चिल्लर हा चर्चेचा विषय ठरला होता. हा प्रकार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत समोर आला आहे.
संजय गायखे असं या उमेदवाराचे नाव आहे. हा उमेदवार बच्चू कडूं यांच्या प्रहार संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 क मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीचा भाग यात येतो. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्याची वेशभूषा केली होती. शिवाय हातात पाच हजाराची चिल्लर त्यांनी आणली होती. उमेदवारी अर्जा सोबत अनामत रक्कम म्हणून त्यांनी ही चिल्लीर दिली. त्यासाठी त्यांनी पाच पिशव्या तयार केल्या होत्या. त्यात हजाराची चिल्लर टाकली होती.
आपण गरिबांच्या पक्षाचे नेतृत्व करतो. त्यामुळे आपल्याकडे नोटा नाहीत. गेल्या पाच वर्षापासून आपण हे पैसे जमा करत आहोत असं त्यांनी सांगितले. पक्षाचे कार्यकर्ते, अपंग, शेतकरी यांनी एक-एक रुपया करून आपल्याला मदत केली आहे. याचे सहा हजार जमले होते. पण अनामत रक्कम म्हणून पाच हजार लागतात. त्यामुळे ते पैसे घेवून आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. हा गरिबांचा एक एक पैसे आहे असं ही ते यावेळी म्हणाले. ही आपली पुंजी असल्याचं ही ते म्हणाले. आपल्याकडे नोटा नाहीत त्यामुळे चिल्लर आणली असंही ते म्हणाले.
शिवाय शेतकऱ्यांची स्थिती राज्यात गंभीर आहे. अशा स्थितीत त्यांची आर्त हाक सर्वापर्यंत गेली पाहीजे म्हणून आपण शेतकऱ्याची वेशभूषा केल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. माझे आजोबा- पणजोबा शेतकरी होते. शेतकऱ्यावर सध्या किंडणी विकण्याची वेळ आली आहे. मालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्या ते दुख: सर्वांना समजले पाहीजे. तो संदेश सगळीकडे गेला पाहीजे म्हणून आपण निवडणूक लढवत असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. काळेवाडी प्रभागातून ते निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक ताकदीने लढणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे.