विखे शरद पवारांवर चिडले, थेट भिडले, चांगलेच सुनावले, नेमकं काय घडलं?

जाहिरात
Read Time: 3 mins
विखे शरद पवारांवर चिडले, थेट भिडले, चांगलेच सुनावले, नेमकं काय घडलं?
अहमदनगर:

अहमदनगर लोकसभेतील शरद पवारांच्या दौऱ्यानंतर इथलं राजकीय वातारवरण चांगलचं तापलं आहे. शरद पवारांनी या दौऱ्यात विखे पाटवांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवाय त्यांना खिजवत त्यांची खिल्लीही उडवली होती. हीबाब राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनीही मग सव्याज परतफेड करत शरद पवारांवर हल्लाबोल केला. शिवाय पवारांनी नगरमध्ये नेत्या नेत्यांना कसे झुंजवत ठेवले याचा भांडाफोडही केला. त्याला आता शरद पवार कसे उत्तर देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'...तो तर शरद पवारांचा धंदाच' 


निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये यासाठी विखेंनी माझाकडे एका उद्योगपतीला पाठवलं होते असा आरोप शरद पवारांनी केली होता. त्याला जोरदार प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांला मी फारसं महत्त्व देत नाही, असं म्हणत खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे अशा शब्दात त्यांनी पवारांचा समाचार घेतला. जिल्ह्यात नेत्या-नेत्यात भांडणं लावायचं काम पवारांनी केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही असा आरोपही त्यांनी केला. 

Advertisement

हेही वाचा - शरद पवारांनी विखे पाटलांची उडवली खिल्ली, एक प्रश्न अन् सर्वच हसले

'पवारांमध्ये तरी कुठे सातत्य' 


विखे पाटील कधी काँग्रेस कधी शिवसेनेत असतात, आता ते कोणत्या पक्षात आहेत अशी विचारणा करत शरद पवारांनी विखेंची खिल्ली उडवली होती. त्यालाही विखेंनी जशाच तसे उत्तर दिले आहे. शरद पवारांमध्ये तरी कुठे सातत्य आहे असे ते म्हणाले. कधी ते पहाटेचा शपथविधी करायला सांगतात. तर कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढून घेतात. काँग्रेस मधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची, ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचं अशा शब्दात त्यांनी पवारांना सुनावले. शिवाय तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले. आता शरद पवारांना आत्म परीक्षण करण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिला. खासदार बाळासाहेब विखेंपासून त्यांना विरोध करण्याची परंपरा शरद पवारांनी आजही कायम ठेवली आहे. असंही ते म्हणाले.

Advertisement

हेही वाचा - महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज! 

शरद पवारांनी उडवली होती विखेंची खिल्ली 


अहमदनगरमध्ये शरद पवारांनी  पत्रकार परिषद घेतली. नगरमध्ये पत्रकार परिषद आणि विखे पाटलांवर बोलायचं नाही असं कधी होत नाही. पवारांनीही संधी साधत विखे पाटील कसे संधीसाधू आहेत, हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील हे कधी काँग्रेसमध्ये असतात तर कधी शिवसेनेत असतात असं म्हणत भर पत्रकार परिषदेत त्यांनी, आजूबाजूच्यांना आता ते कुठल्या पक्षात आहे असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाने सर्वानाच हसू आवरले नाही. पण पवारांनी यातून आपल्याला जे साधायचं होते ते साध्य करून घेतले.  

Advertisement

हेही वाचा - गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?