रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचं ठरलं, प्रियांका गांधी लढवणार निवडणूक

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडपैकी एका मतदारसंघाची निवड केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rahul Gandhi Priyanka Gandhi
मुंबई:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडपैकी एका मतदारसंघाची निवड केली आहे. राहुल उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार राहणार आहेत. तर वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देतील. त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढणार आहेत. राहुल गांधी या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. नियमानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर 14 दिवसांमध्ये एक जागा सोडावी लागते. राहुल गांधी यांना निर्णय घेण्यासाठी 18 जूनपर्यंतची डेडलाईन होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राहुल यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये रायबरेली मतदारसंघातून 3 लाख 90 हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यांना एकूण 6 लाख 87 हजार 649 मतं मिळाली होती. तर वायनाडमध्ये त्यांना 6 लाख 47 हजार 445 मतं मिळाली. ते वायनाडमधून 3 लाख 64 हजार 422 मतांनी विजयी झाले होते. 

रायबरेलीची का केली निवड?

रायबरेलीची निवड करण्याची अनेक कारणं आहेत. रायबरेली हा गांधी परिवाराचा बालेकिल्ला आहे. सोनिया गांधी यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांचे वडील राजीन गांधी अमेठीमधून निवडणूक लढवत असत. रायबरेलीमधून सोनिया गांधी, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी खासदार होते. 

 ( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )

उत्तर प्रदेश हे भारतीय राजकारणापासून महत्त्वाचं केंद्र आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं रायबरेलीसह अमेठीची जागाही परत मिळवली आहे. पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात पुनरागमन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी वायनाडच्या जागी रायबरेलीची निवड केली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article