Raigad News: कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर ट्वीस्ट, शिवसेना आमदार कन्या निवडणूक लढणार?

त्यामुळे आमदारांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर )यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची रणनिती आखली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
  • मंत्री गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली यांनी उमेदवारी अर्ज घेतले
  • सुनिल तटकरे यांनी आपल्या मुलासाठी या जागेसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
रायगड:

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था जागेवर ट्वीस्ट निर्माण झाला आहे. ही जागा कोणत्या ही स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायची नाही अशी भूमीका शिवसेनेनं घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. शिवसेनेकडून आधी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांनी अर्ज घेतला. त्यानंतर अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली यांनी ही उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे ही जागा नक्की कोणाची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र सुनिल तटकरे यांनी आपल्या मुलासाठी फिल्डींग लावली असल्याचं बोललं जात आहे. 

कोकणातील विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेसला ही जाग मिळणार याची चर्चा अजून ही सुरू आहे. त्यात आता शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर )यांनी देखील या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल घेतला आहे. जुईली दळवी  स्वतः रत्नागिरीमध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांसोबत गेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत नक्की महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार अशी चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर

विकास गोगावले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज ही घेतला होता. मात्र असं  असलं तरी मंत्री भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदावरून समझोता झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गोगावले हे तटकरेंसाठी ही जागा सोडू शकतील अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र असं असलं तरी पक्षातील एक गट तटकरेंच्या विरोधात आहे. त्यामुळे आमदारांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर )यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची रणनिती आखली आहे. आता तटकरेंना दळवी यांची ही समजूत काढावी लागणार आहे.  

नक्की वाचा - Sharad Pawar: शरद पवारांना एकाच वेळी दोन धक्के! दोन माजी मंत्री भाजपाच्या वाटेवर, पक्षाला मोठा सुरुंग

जुईली दळवी (जुईकर) या अलिबाग मुरूड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या आहेत. जुईली दळवी (जुईकर) या अलिबाग मतदार संघात तरुणांमध्ये राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत. त्यांनी अलिबाग पंचायत समितीमध्ये 2019 मध्ये सदस्य पद देखील भूषविले आहे. त्यांनाही विधान परिषदेचे वेध लागले आहे. तर सुनिल तटकरे यांना आपला मुलगा अनिकेत तटकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवायचे आहे. त्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीतील या जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे.