'रंगभेद' वक्तव्य भोवले, सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

Sam Pitroda quits : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे

जाहिरात
Read Time: 1 min
Sam Pitroda
मुंबई:

Sam Pitroda quits : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. भारतामधील पूर्वेतील लोकं चायनीज लोकांसारखे, पश्चिमेतील अरब, उत्तरेतील गोरे आणि दक्षिण भारतामधील लोकं आफ्रिकन व्यक्तींसारखे दिसतात, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं होतं. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधकांनी जोरदार टीका केली.  हा मुद्दा निवडणुकीच्या काळात तापणार हे लक्षात येताच पित्रोदा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी सोडलंय.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सॅम पित्रोदा यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. पित्रोदा यांनी स्वखुशीनं राजीनामा दिला असून तो स्विकारण्यात आला आहे, अशी पोस्ट रमेश यांनी X वर लिहिली आहे. <

पित्रोदा यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. मागच्याच महिन्यात 'वारसा करा' वरील त्यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ उडाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार 8 मे) वारंगलमधील जाहीर सभेत पित्रोदा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : 'पूर्व भारतामधील लोक चिनी तर दक्षिणेतील आफ्रिकन सारखी दिसतात', पित्रोदांच्या वक्तव्यानं नवा वाद )