शरद पवार सध्या अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. अहमदनगर हा तसा विखे पाटलांचा गड. विखे पाटील कोणत्याही पक्षात असो त्यांची अहमदनगर जिल्ह्यावरची पकड काही सुटू दिली नाही. शरद पवार आणि विखे पाटील याचे वैर तर खुप जुने आहे. दोघे ही एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. पवार आता नगरमध्ये असल्याने त्यांनीही विखे पाटलांवर टिका करण्याची संधी सोडली नाही. विखे पाटील हे कधी काँग्रेसमध्ये असतात तर कधी शिवसेनेत असतात असं वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यानंतर आजूबाजूला बघत आता ते कुठल्या पक्षात आहेत अशी विचारणा केली, त्यानंतर एकच हशा पिकला.
नगरमध्ये जाऊन विखेंची खिल्ली
अहमदनगरमध्ये शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतली. नगरमध्ये पत्रकार परिषद आणि विखे पाटलांवर बोलायचं नाही असं कधी होत नाही. पवारांनीही संधी साधत विखे पाटील कसे संधीसाधू आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील हे कधी काँग्रेसमध्ये असतात तर कधी शिवसेनेत असतात असं म्हणत भर पत्रकार परिषदेत त्यांनी, आजूबाजूच्यांना आता ते कुठल्या पक्षात आहे असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाने सर्वानाच हसू आवरले नाही. पण पवारांनी यातून आपल्याला जे साधायचं होते ते साध्य करून घेतले.
हेही वाचा - ...आता अबू आझमींचा नंबर? 400 कोटीची बेनामी मालमत्ता? सोमय्या अॅक्शन मोडमध्ये
'400 पारचा नारा चुकीचा'
लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेला 400 पारचा नारा आपल्याला चुकीचा वाटतो असे स्पष्ट मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केले. देशात वेगळी स्थिती आहे. त्यामुळे ऐवढ्या जागा जिंकण्याची शक्यता नाही असेही ते म्हणाले. महागाई, बेरोजगारी, यासारखे प्रश्न जनतेला सतावत आहे. त्याचे उत्तर जनताच मतदानातून देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - 'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार'
'तु्म्ही 10 वर्ष काय केले?'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? मी त्यांना विचारतो गेली दहा वर्ष सत्तेत तुम्ही आहात. तुम्ही या दहा वर्षात काय केलं ते आधी सांगा, अशी विचारणाच शरद पवारांनी केली. तुम्ही काय काय केलं आहे हे जगाला माहित आहे असा टोलाही शहा यांना पवार यांनी लगावला. दरम्यान यावेळी त्यांनी फडणवीसांनाही लक्ष्य केलं. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले अशी विचारणाही त्यांनी केली. शिवाय आयोध्येत रामाच्या मुर्ती बरोबर सितेची मुर्ती का नाही असा मी प्रश्न केला होता. त्यामुळे मोदींची अडचण झाली असावी असेही ते म्हणाले.
हेही वाचा - नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला