Uran Nagaradhyaksha : उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर, भाजपला धक्का; शरद पवार गटाचा नगराध्यक्ष

उरण नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांचा १४४८ मतांनी विजय झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Uran Municipal Council : कोकणातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. दरम्यान उरणमधून मोठी बातमी समोर आली आहे. उरण नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांचा १४४८ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपाच्या शोभा कोळी शहा यांचा पराभव केला आहे. उरणमध्ये २१ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी १२ भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील ९ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाचे नगरसेवक जास्त निवडून आले असले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्ष झाला आहे.

उरणमध्ये मोठा राजकीय उलटफेर...

उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी भाजपाच्या शोभा कोळी–शहा यांचा तब्बल १४४८ मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे.

नगरपालिकेतील एकूण २१ नगरसेवकांपैकी भाजपाचे १२ नगरसेवक निवडून आले असले, तरी महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक असतानाही रणनीती, एकजूट आणि विश्वासाच्या जोरावर नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे आले आहे. संख्याबळ कमी असतानाही सत्ता हस्तगत करण्यात आल्याने उरणच्या राजकारणात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

भावना घाणेकर यांच्या विजयामुळे उरणमध्ये महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालाने भाजपाला संख्याबळ असूनही नेतृत्व गमवावे लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विजयानंतर शहरात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. उरणच्या विकासाला गती देण्याचा निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

आज सकाळी उरणमध्ये राडा...

उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी  राडा झाल्याची माहिती समोर आली होती. नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुममध्ये घुसला होता. यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना ही व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये कशी गेली असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. भावना घाणेकर यांनी  तहसीलदारांसमोर सवाल उपस्थित केला होता. 

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंना धक्का, होमग्राऊंडवर हार

Topics mentioned in this article