शरद पवारांना धक्का, 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान NCP अजित पवार गटाच्या वाटेवर, धीरज शर्मांचा प्रवेश

सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या बैठकीत हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीनंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबईत राष्ट्रीय बैठक पार पडत आहेत. यावेळी धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उपस्थिती लावली. याशिवाय धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सोनिया दुहान यांनी अधिकृत प्रवेश केला नसला तरी त्या राष्ट्रवादींच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा या दोघांनी शरद पवारांना साथ दिली होती. मात्र आज दोघांनी शरद पवारांशी फारकत घेतल्याचं चित्र आहे. 

धीरज शर्मा यांनी फेसबुक पोस्ट चर्चेत...
धीरज शर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राजीनाम्याची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, मी धीरज शर्मा आहे. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पावर पक्षाकडून दिलेल्या सर्व पदातून स्वत:ला मुक्त करत आहे. 

Advertisement

शरद पवारांना झटका...
सोनिया दुहान यांनी बराच काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 च्या राजकीय घटनाक्रमानंतर सोनिया चर्चेत होत्या. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे काही आमदार खासगी विमानाने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी शरद पवारांनी सोनिया यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. यावेळी सोनिया यांना चार आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढलं होतं. यामध्ये नरहरी झिरवळ, दौलत दरोदा, अनिल पाटील आणि नितीन पवार यांचा समावेश होता. चौघेही जणं अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर बेपत्ता झाले होते.या आमदारांना सोनिया यांनी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचविण्यात यश मिळवलं होतं.  यानंतर सोनिया माध्यमांसमोर आल्या होत्या. त्यामुळे सोनिया या शरद पवारांच्या विश्वासूपैकी एक मानल्या जातात. 

Advertisement

नक्की वाचा - 'अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदेंचे प्रयत्न'

कोण आहेत सोनिया दुहान?
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांना एनसीपीचं संकट मोचनदेखील म्हटलं जात. सोनिया दुहान यांनी गुरूग्राममधील एका हॉटेलमधून 150 भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नकळत एनसीपीच्या चार आमदारांचं रेस्क्यू केलं होतं. तब्बल अडीच वर्षांनंतर म्हणजे 2022 मध्ये महाविकास आघाडी जेव्हा संकटात सापडली त्याहीवेळी सोनिया दुहान यांनी मोर्चा सांभाळला. सूरत ते गुवाहाटी आणि पुन्हा गोव्यापर्यंत बंडखोर आमदारांचा पाठलाग केला. गोव्यात सोनिया दुहान यांना आमदार राहणाऱ्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यात यश मिळालं. मात्र गोवा पोलिसांनी सोनिया यांना अन्य एका साथीदारासोबत अटक केली होती. सोनिया दुहान यांना एनसीपीची लेडी जेम्स बॉन्डही म्हटलं जातं. काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी राजीनामा दिला होता, त्यावेळी राजीनामा देण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये सोनिया यादेखील होत्या. सोनिया या हरियाणातील हिसार येथील राहणाऱ्या आहेत. त्या पेटवाडमध्ये एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव संसार सिंह आणि आईचं नाव संतरो देवा आहे. त्यांनी शालेय शिक्षण हिसार जिल्ह्यातील आपल्या गावातून घेतलं.

Advertisement